Temple Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Temple Election: देवस्थान समिती निवडणूक; कुठे बहिष्कार, तर कुठे बिनविरोध!!

Goa Temple Committee Election: साळ आणि मये येथील मिळून दोन देवस्थानांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या, तहापि, बऱ्याच देवस्थानांमध्ये समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली

Akshata Chhatre

पणजी: देवस्थानांच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने देवस्थानांच्या प्रशासकांना निर्देश जारी करण्यात आले होते. मात्र, रविवारी (दि. ९ फेब्रुवारी) काही ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. साळ आणि मये येथील मिळून दोन देवस्थानांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या, तहापि, बऱ्याच देवस्थानांमध्ये समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

साळ येथील श्री महादेव भूमिका देवस्थानच्या अध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला, तर मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या निवडणूक प्रक्रियेस हरकत घेण्यात आली. साळ येथील श्री महादेव भूमिका देवस्थानच्या निवडणुकीवेळी सुरवातीपासूनच गदारोळ निर्माण झाला.

अध्यक्षपदाच्या मुद्यावरून आज वातावरण तापले होते. दुपारी उशिरापर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

देवालयांचे प्रशासक आदी अधिकारी साळ येथील परिस्थितीवर नजर ठेवून होते, देवस्थानचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार यांनी या वृत्तास दुजोरा देताना साळमधील स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले.

श्रीनिवास धेंपे बिनविरोध

महालक्ष्मी देवस्थान समितीची निवडणूक बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदी उद्योगपती श्रीनिवास धेंपे, तर सचिवपदी महेश कांदोळकर, खजिनदारपदी गौरव धोंड आणि मुखत्यारपदी नारायण मांद्रेकर यांची निवड झाली.

श्री लईराई देवस्थानच्या अध्यक्षपदी गावकर

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवस्थानच्या अध्यक्षपदी दीनानाथ शांबा गावकर यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष गणेश चंद्रकात गावकर यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान सभागृहात ही सभा घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT