Goa Temperature Update Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature : तापमान ३७ अंशापर्यंत जाणार, नागरिकांना काळजीचे आवाहन

Goa Temperature : नागरिकांना असह्य उष्म्याला सामोरे जावे लागत आहे. आज राजधानी पणजी येथे कमाल ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जी गेल्या पंधरा दिवसांतील सर्वोच्च होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Temperature :

पणजी, राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नागरिकांना असह्य उष्म्याला सामोरे जावे लागत आहे. आज राजधानी पणजी येथे कमाल ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जी गेल्या पंधरा दिवसांतील सर्वोच्च होती. पुढील दोन दिवसात तापमानाचा पारा ३७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन वेधशाळेद्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात २ जून ते ४ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात ७९ टक्के एवढ्या कमाल आर्द्रतेची नोंद करण्यात आली. जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ४ टक्के कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

Human Animal Conflict: 'ओंकार हत्ती' पिके नष्ट करण्यासाठीचे आला का? जंगलातील अन्नसाखळी मोडली त्याचे काय?

Goa Theft: ताळगाव झाले आता गणेशपुरी! गुन्हेगारीचा छडा लागेल का? पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान

Goa: 'गोव्यातील शेतकऱ्यांनी शेती केली नाही, तर पुढील पिढी शेतात उतरणार नाही', CM सावंतांनी व्यक्त केली भिती

Goa Petrol Diesel Prices: गोव्यात सध्या पेट्रोल - डिझेलचे दर काय आहेत? जाणून घ्या ताजे भाव

SCROLL FOR NEXT