Kala Academy: कला अकादमीत पाण्याची वानवा! टँकर मागवूनही उशिरापर्यंत आलाच नाही

Kala Academy water shortage: बांदोडकर मैदानावर पुस्तक महोत्सवात येणारे लोक कला अकादमीतील शौचालयाचाच वापर करतात. दुपारपर्यंत पाणी होते, परंतु पाण्याचा वापर अधिक झाल्याने ते संपले.
Water Shortage
Water ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीत दुपारनंतर पाण्याची वाणवा जाणवली. शनिवारी सुटीमुळे बांदोडकर मैदानातील पुस्तक महोत्सवास आलेल्यांची गर्दी, दुपारी हेडगेवार प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थी-पालकांची गर्दी यामुळे येथील शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला.

त्यामुळे सायंकाळी शौचालयात पाणीच नसल्याने गोंधळ सुरू झाला, येथील सुरक्षारक्षकांनी सार्वजनिक बांधकाम खात्यास टँकर पाठवण्याची सूचना दुपारी चार वाजता केली तरीही सायंकाळी आठ वाजेपर्यंत टँकर आला नसल्याचे दिसून आले.

बांदोडकर मैदानावर पुस्तक महोत्सवात येणारे लोक कला अकादमीतील शौचालयाचाच वापर करतात. दुपारपर्यंत पाणी होते, परंतु पाण्याचा वापर अधिक झाल्याने ते संपले. शौचालयात फ्लश होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या.

Water Shortage
Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

पाणी संपल्याने येथील सुरक्षारक्षकांनी तात्काळ संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्यास याबाबत सूचित केले आणि टँकर पाठविण्याची विनंती केली, परंतु सायंकाळी चार वाजता केलेल्या विनंतीला साबांखाच्या कार्यालयाकडून अजिबात प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी आठ वाजेपर्यंत तरी टँकर काही पोहोचला नसल्याचे आढळून आले.

Water Shortage
Kala Academy: कसे कोसळले 'कला अकादमी'चे छत? ‘टास्क फोर्स’ची होणार बैठक; हैद्राबादच्या अहवालाकडे विशेष लक्ष

विशेष बाब म्हणजे महोत्सवासाठी राज्यभरातून लोक आले होते. दक्षिण गोव्यातील काही सुजाण नागरिकांनी याबाबत प्रसारमाध्यमांकडे तक्रारी केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत विचारणा करण्यासाठी कला अकादमीचे चेअरमन बाबू कवळेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com