Goa weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

October Heat: राज्यातील कमाल आणि कमान तापमानात सरासरी तापमानाच्या तुलनेत वाढ झाली आहे. कमाल तापमान २.६ अंशांनी वाढले असल्याने ‘ऑक्टोबर हिट’चे परिणाम जाणवू लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत चालला आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३४.८ अंशांवर पोहोचला. ही स्थिती कायम राहिल्यास दोन दिवसात ३५ अंशांवर तापमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील कमाल आणि कमान तापमानात सरासरी तापमानाच्या तुलनेत वाढ झाली आहे. कमाल तापमान २.६ अंशांनी वाढले असल्याने ‘ऑक्टोबर हिट’चे परिणाम जाणवू लागला आहे. दुपारी घराबाहेर पडल्यास घामाच्या धारा लागत आहेत.

आठवड्याभरापूर्वी राज्यात राज्यातील कमाल तापमान ३२ अंश इतके होते. राज्यात आर्द्रतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कमाल ८६ टक्के इतकी आर्द्रता नोंदविण्यात आली जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ११ टक्के अधिक आहे. रविवार व सोमवारी राज्यातील विविध भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यताही गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

आरोग्याची घ्या काळजी

राज्यात वाढत असलेल्या उष्म्यापासून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, शहाळे, हलका आहार घ्यावा, तेलकट, मद्यपान, चहा-कॉपीचे सेवन टाळावे जर उष्म्याचा त्रास अधिक जाणवल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जावे.

या काळात सततच्या होणाऱ्या हवामान बदलांमुळे ताप, थंडी, संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना अधिक जपावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT