Goa Beach In Summer Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: चुभती, जलती गर्मी का मौसम आया! गोव्यातील बीच रिकामे; टॅक्सी, हॉटेल व्यवसायावर परिणाम

Tourist In Summer: गोव्‍यात गेल्‍या आठ-दहा दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे.

Sameer Panditrao

Goa Tourism Footfall In Summer

फातोर्डा: गोव्‍यात गेल्‍या आठ-दहा दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे. याचा जबर फटका समुद्र किनाऱ्यांवरील व्यावसायिकांना बसला असून गेले काही दिवस समुद्र किनाऱ्यांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

अनेक किनाऱ्यांवर सध्या सन्नाटा पसरलेला आहे. यामुळे किनारी भागातील अनेकांचे व्यवसायही तोट्यात आले आहेत. यात शॅक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी व मोटरसायकल पायलट यासह इतर व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे.

दक्षिण गोव्यातील वार्का, माजोर्डा, कोलवा, बाणावली, केळशी, आगोंद समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.

काही किनाऱ्यांवर तुरळक विदेशी पर्यटक दिसत असले तरी त्यांचेही प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्या जानेवारी व फेब्रुवारीच्या २० तारखेपर्यंत देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसत होते. वाढत असलेल्या उकाड्यामुळे तेही दिसेनासे झाले आहेत.

व्यावसायिक म्हणतात...

निवासी हॉटेल व्यावसायिक पीटर नोरोन्हा यांनी सांगितले की, ख्रिसमसपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त खोल्या भरल्या होत्या. मात्र गेल्या १५ दिवसांपासून १० खोल्यांचे सुद्धा बुकिंग झाले नाही.

किनाऱ्यावरील परिसरात भाडे मारणारे टॅक्सी चालक अहमद यांनी सांगितले की, या दहा दिवसांच्या काळात दिवसाला दोन भाडी मिळणे सुद्धा मुश्कील झाले आहे.

केळशी येथील शॅक व्यावसायिक क्रूझ कार्दोज यांनी सांगितले, मागील दोन महिने पर्यटकांची रेलचेल असल्‍याने चांगले चालले होते. मार्चच्या सुरवातीपासून पर्यटक नाहीसे झाले आहेत. पर्यटक नसल्याने काही वेळापुरते शॅक खुले ठेवत आहे आणि नंतर बंद करण्याची वेळ येत आहे. वाढत असलेला उकाडा याला कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक पेले फर्नांडिस यांनीही क्रूझ कार्दोज यांची री ओढलेली आहे. अशीच स्थिती इतर व्यावसायिकांचीही झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT