Goa taxi owners protest against government order Dainik Gomantak
गोवा

Taxi Protest: 4 दिवसांत आदेश कायमचा रद्द करा; अन्यथा राज्यभर चक्का जाम, टॅक्सीमालकांचा सरकारला अल्टिमेटम

Goa Taxi Strike Chakka Jam Warning: खासगी प्रवासी टॅक्सीचालक व इतर वाहनधारकांसाठी हानीकारक ठरणाऱ्या परराज्यातील व्यावसायिकांच्या वाहन नोंदणीविषयी काढलेला आदेश स्थगित ठेवला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: खासगी प्रवासी टॅक्सीचालक व इतर वाहनधारकांसाठी हानीकारक ठरणाऱ्या परराज्यातील व्यावसायिकांच्या वाहन नोंदणीविषयी काढलेला आदेश स्थगित ठेवला आहे. तो आदेश येत्या चार दिवसांत सरकारने कायमचा हटवावा अन्यथा चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी (ता.५) टॅक्सी मालक संघटनेने दिला आहे.

वाहन नोंदणीविषयी वाहतूक खात्याने जो ‘सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स, १९८९’च्या नियम ४ मधील उपनियम ११ अन्वये, गोवा शासनाद्वारे विहित केले आहे की, पत्त्याच्या अचूकतेचा पुरावा काही दस्तऐवज जाहीर केले आहेत, त्यांची मूळ प्रत किंवा संबंधित उतारा तथा स्वतःची स्वाक्षरी असलेला पुरावा स्वीकारला जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे परराज्यातील व्यावसायिक येथे येऊन आपली वाहने नोंद करून व्यवसाय करीत आहेत, त्याला स्थानिक व्यवसायिक टॅक्सी, मोटार, ट्रक, जेसीबी व इतर वाहनधारकांनी आक्षेप घेतला आहे.

यामुळे स्थानिक व्यावसायिकांना फटका बसणार असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हा आदेश सरकारने मागे घ्यावा, यासाठी टॅक्सी मालकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक दिली; परंतु पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्री निवासापासून ५० मीटर अंतरावर अडवून धरले. मुख्यमंत्र्यांशी भेट घडवावी, अशी मागणी टॅक्सीमालकांनी केली. यावेळी सुदीप ताम्हणकर, बप्पा कोरगावकर, योगेश गोवेकर यांच्यासह इतर संघटनांचे नेते उपस्थित होते.

त्यांनी पोलिसांकडे मुख्यंत्र्यांबरोबर भेट घडवावी, अशी मागणी केली. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बॅरिकेड्‌स लावून टॅक्सी मालकांच्या मोर्चाला थोपवून धरले. याप्रसंगी टॅक्सी मालक आणि मामलेदार यांच्यात चर्चा झाली; परंतु मामलेदार यांनी केलेल्या सूचना टॅक्सी मालकांनी मान्य केल्या नाहीत.

टॅक्सीमालकांवर अन्यायच!

ताम्हणकर म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आणि काढलेला आदेश मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्र्यांना आमचे पाचजणांचे शिष्टमंडळ भेटणार होते; पण ते निवासस्थानी येऊ शकले नाहीत. सरकार टॅक्सीमालकांवर विविध प्रकारे अन्याय करीत आले आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठवला आहे. सध्या जो वाहतूक खात्याने आदेश काढला आहे, त्याबाबत आपण वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे बोललो आहे. त्यांनी आपणास आदेश स्थगित केला असून, उद्या (शुक्रवारी) तो मागे घेतल्याचा अध्यादेश काढला जाईल असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

Cyber Fraud Safety Tip: दिवाळीत शॉपिंग करताना सावधान! 80 टक्के डिस्काउंटच्या नावाखाली सायबर भामटे घालू शकतात गंडा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Indian Football League: 2 सामन्यांत 2 विजय! धेंपो क्लबची विजयी घोडदौड कायम; समलेश्वरीवर 2-1 ने मात

SCROLL FOR NEXT