...त्याचा डिजिटल मीटरशी संबंध काय? आज सुनावणी Dainik Gomantak
गोवा

...त्याचा डिजिटल मीटरशी संबंध काय? आज सुनावणी

गोवा खंडपीठाचा याचिकादाराला टॅक्सी डिजिटल मीटर्ससंबधी सवाल

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) टॅक्सींना डिजिटल मीटर्सची (taxi digital meter) सक्ती न करता पर्यायी मोबाईल ॲप्लिकेशनची मुभा देण्याची मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च (Mumbai) न्यायालयाच्या (Court) गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आली. याचिकादार हा अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेचा पदाधिकारी असल्याने त्याचा मीटर्सशी संबंध काय? असा प्रश्‍न केल्याने याचिकादाराच्या वकिलांनी त्यासंदर्भात सूचना घेण्यासाठी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. (Goa taxi digital meter hearing today)

याचिकादार सुदीप ताम्हणकर यांच्यासह इतर दोघांनी ही याचिका सादर केली आहे. त्यातील दोघा याचिकादारांनी टॅक्सींना डिजिटल मीटर्स बसविले आहेत. प्रवाशाचे दरपत्रक दर्शविणारी नवनवीन मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत त्यामुळे डिजिटल मीटर्सची सक्ती केली जाऊ नये व त्यासाठी पर्याय ठेवण्यात यावेत या संदर्भातचा अर्ज सरकारकडे करण्यात आला आहे. मात्र त्यावर अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ही मुभा देण्याचे निर्देश त्यांना द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. सरकारने 2015 मध्ये टॅक्सींना भाडेदर डिजिटल मीटर्स बसविण्याची सक्ती केली होती. त्या काळात नवे मोबाईल ॲप्लिकेशन नव्हते.

अधिकारिणीकडे प्रयत्न करावा...

टॅक्सी चालकांची संघटना आहे तर त्यांनी याचिका का सादर केली नाही. त्यांची संघटना तर सक्षम आहे. याचिकादाराने ही याचिका सादर करण्यामागे काय समस्या आहे. याचिकादाराने जी मागणी केली आहे, त्यासंदर्भातील निवेदन संबंधित अधिकारिणीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे ही याचिका मागे घेऊन संबंधित अधिकारिणीकडे प्रयत्न करावा, असे तोंडी निरीक्षण आज गोवा खंडपीठाने नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT