Ola Taxi in Goa Dainik Gomantak
गोवा

Ola Uber in Goa : ‘ओला-उबर’ला गोव्यात घ्याल तर खबरदार!

आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ लवकरच सुरू होणार असल्याने प्रवाशांसाठी ॲप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु खासगी पर्यटक टॅक्सी संघटनांनी याला जोरदार विरोध केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ola Uber in Goa : आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ लवकरच सुरू होणार असल्याने प्रवाशांसाठी ॲप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु खासगी पर्यटक टॅक्सी संघटनांनी याला जोरदार विरोध केला आहे. संघटनेने या ॲप आधारित टॅक्सी सेवेला कोणत्याही परिस्थितीत गोव्यात येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना गोव्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास मोपा विमानतळावर सर्व टॅक्सी उभ्या करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

टॅक्सी व्यवसाय हा पर्यटक उद्योगातील प्रमुख घटक असून यात गोमंतकीयांचा समावेश आहे. परंतु ॲप आधारित टॅक्सी सेवा आणून सरकार टॅक्सी व्यवसायिकांना संपवण्याचे कारस्थान करत आहे. सध्या ओला आणि उबेर सेवा ही दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इत्यादी महानगरांमध्ये आहे. गोव्यात आल्यास स्वयंरोजगाराचे साधन काढून घेत असल्यासारखे आहे, असे टॅक्सी संघटनांचे म्हणणे आहे.

..तर सरकार जबाबदार

राज्य सरकारने नव्याने सुरू होणाऱ्या मोपा विमानतळावर ओला आणि उबेर ही टॅक्सी सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. ‘गोवा माईल्स’ नंतर आता आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा उत्तर गोवा टॅक्सी संघटनेचे सदस्य योगेश गोवेकर यांनी दिली आहे.

तर खासगी पर्यटक टॅक्सी आणि काळी-पिवळी टॅक्सी यात फरक आहे. परंतु राज्यात ओला आणि उबेर आणण्याला आमचा पूर्वी पासूनच विरोध आहे. मात्र, या विषयावरून आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही हा निर्णय अखिल गोवा काळी-पिवळी टॅक्सी संघटना बैठक घेऊन ठरवेल असा इशारा काळी - पिवळी टॅक्सी संघटनेच्या सुनील नाईक यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT