मोरजी: पक्षाचा आणि मतदारांचा विश्वासघात (Betrayal of voters) करणाऱ्या आमदाराला (MLA) आता येत्या निवडणुकीत थेट घरचा रस्ता दाखवायचा आहे. जाती भेद न मानणाऱ्या बहुजन समाजाच्या मगो पक्षाला पेडणेवासियांनी साथ द्यावी (The people of Pedne should support the Mago Party of Bahujan Samaj) असे आवाहन पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर (Former MLA Parashuram Kotkar) यांनी मालपे पेडणे येथे मगोचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या मगो कार्यालयात धारगळ येथील कॉंग्रेसचे खंदे कार्यकर्त्ये आणि माजी पंच सदस्य आवेलीन रोद्रीगीस यांनी मगो पक्षात प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर बोलत होते.
१६ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मगोचे नेते प्रवीण आर्लेकर, मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर, केंद्रीय समितीचे सदस्य सुदीप कोरगावकर, राजन खडपकर ,नरेश कोरगावकर, मोपा सरपंच सरस्वती नाईक, महेश परब, आवेलीन रोद्रिगीस आदी उपस्थित होते. माजी आमदार परशुराम कोटकर यांनी पुढे बोलताना पक्षाची तत्व मान्य करून आवेलीन यांनी प्रवेश केल्याबद्दल त्याचे स्वागत केले.
माझी शेवटची निवडणूक
माजी आमदार परशुराम कोटकर यांनी बोलताना मोठ्या आशेने मागच्या निवडणुकीत मगो पक्षाच्या तिकिटावर बाबू आजगावकर याना तनमनधन अर्पून लोकाना विनवणी करून लोकांच्या दारावर जावून मते मागितली. आणि त्याना विजयी केले. परंतु त्यांच्याकडे पक्षाची निष्ठा नाही. त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलण्याची आपली पारंपारिक वृत्ती परत एकदा मतदारांना दाखवून दिली. मतदार राजा आता तुमची वेळ आहे त्याला त्यांची जागा दाखवण्याची असे आवाहन केले.
सध्या आपल्या कानावर खूप काही ऐकायला मिळते, हुकुमशाहीच्या दबावाला आता पेडणेकर बळी पडणार नाही. हि निवडणूक आपली शेवटची निवडणूक आहे. आरोग्य साथ देत नसल्याने या सहा महिन्यात कोरगाव पासून इब्रामपूर पर्यत वाड्यावाड्यावर घराघरात जावून मगोसाठी परत एकदा मते मागणार आहे. मगोला परत पेडणे मतदार संघातून विजयी करण्याची शक्ती बहुजनांचे दैवत भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळे लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
बाबू आजगावकर यांचा घेतला जवळून अनुभव
माजी आमदार परशुराम कोटकर यांनी बोलताना बाबू आजगावकर यांच्याविषयी आपण वाईटहि बोलत नाही, आणि चांगलेही बोलत नाही. कारण त्यांचा आपण जवळून अनुभव घेतलेला आहे. त्याला मगोची उमेदवारी मिळत नव्हती, जीत आरोलकर याना पुढे करून मगो नेत्यांची मनधरणी केली.
ढवळीकर बंधूना दिली धमकी
बाबू आजगावकर याना ढवळीकर बंधू २०१७ सालची मगोची उमेदवारी देत नव्हते, ढवळीकर बंधूना आम्ही धमकी दिली, जर बाबुना उमेदवारी दिली नाही तर, मगोच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव करू, त्यामुळे हि उमेदवारी मिळाली असे सांगितले.
सर्व पक्षाचे कार्यकर्त्ये हितचितक पक्षासोबत
सद्या सत्ता असल्याने इतर पक्षाचे कार्यकर्त्ये हितचितक उघडपणे मगो पक्षात येत नाही. मात्र मगो कडे सर्व पक्षाचे कार्यकर्त्ये येणार आहेत. यापुढे धमक्यांना भिक न घालता सर्वांनी संघटीत होवून मगोला विजयी करण्याचे आवाहन केल.
प्रवीण आर्लेकर
मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना मगो पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे. या पक्षाकडे अनेक राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्त्ये आकर्षित होत आहेत. येणाऱ्या काळात अनेकजण मगो पक्षात प्रवेश करणार आहेत. सध्या आमदाराची दडपशाही वाढल्याने आता पेडणेकर पर्रीवर्तन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
आवेलीन रोद्रीगीस
आवेलीन रोद्रीगीस यांनी बोलताना मंत्री बाबू आजगावकर हे सत्ता आहे तिथ नसून जिथ स्वार्थ आहे तिथ बाबू आहे असा आरोप करून बाबू साठी ज्यांनी ज्यांनी काम केले त्याला त्यांनी धोका दिल्याचा आरोप केला. गांधी मार्केट मधून याना आम्हीच आणले आणि धारगळचा आमदार केले. नागरिकांचा अवमान करण्याची त्याची वृत्ती आहे.
यावेळी मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर , सुदीप कोरगावकर व राजन खडपकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.