Supash Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

Ponda News : सुपषच्या या यशाचे फोंड्यातील नागरिकांकडून कौतुक केले जात असून अलीकडच्या काळात अशाप्रकारची कामगिरी करणारा सुपष फोंड्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, येथील सुपष विकास चोडणकर याने जेईई मेन परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

सुपषच्या या यशाचे फोंड्यातील नागरिकांकडून कौतुक केले जात असून अलीकडच्या काळात अशाप्रकारची कामगिरी करणारा सुपष फोंड्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएतर्फे सुपष हा जेईईमध्ये अव्वल ठरल्याचे घोषित करण्यात आले. सुपषने ९९.९४ टक्के गुण संपादन केले.

एस्टेलर उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या सुपष चोडणकर याने सातत्याने मन लावून अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

सुपषने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच गुरुजनांना दिले आहे. आपल्याला पुढील शिक्षण हे अभियांत्रिकी क्षेत्रातून किंवा संशोधन क्षेत्रातून मिळवायचे असल्याचे सुपष चोडणकर म्हणाला.

दरम्यान, सुपष चोडणकर हा राज्यातील अव्वल असलेल्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असोसिएट प्राध्यापक असलेल्या विकास चोडणकर तसेच दीपा यांचा पुत्र असून अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता राखली तर यश हमखास मिळू शकते, असे प्रा. विकास चोडणकर म्हणाले.

चोडणकर दाम्पत्याला दोन पुत्र असून ज्येष्ठ पुत्र रौनक हा सध्या गोवा वैद्यकीय दंतचिकित्सा महाविद्यालयात शिकत असून दुसऱ्या पुत्राचा ओढा हा अभियांत्रिकी शिक्षणाकडे असल्याचे विकास चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT