Goa Sunburn Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn:...तर फेस्टिव्हल बंद, म्युझिक सिस्टीमही होणार जप्त; सनबर्नवर पोलिस, ध्वनी प्रदूषण मंडळाची करडी नजर

Goa Sunburn 2024: दरवर्षी वागातोर येथे होणारा सनबर्न फेस्टिव्हल यावर्षी पहिल्यांदाच धारगळ येथे स्थलांतरीत केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sunburn 2024

पणजी: सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल धारगळ येथे आजपासून (२८ डिसेंबर) तीन दिवस होणार आहे. या फेस्टिव्हलनिमित्त कार्यक्रमस्थळी केलेली रोषणाई आणि आयोजन व्यवस्थेने देशी-विदेशी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फेस्टिव्हलवेळी संगीताच्या मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे.

या ठिकाणी सुरक्षा तसेच वाहतूक व्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेची कसोटी लागणार आहे.

दरवर्षी वागातोर येथे होणारा सनबर्न फेस्टिव्हल यावर्षी पहिल्यांदाच धारगळ येथे स्थलांतरीत केला आहे.

...तर फेस्टिव्हल बंद

या फेस्टिव्हलवर नजर ठेवण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून त्यामध्ये पोलिस, ध्वनी प्रदूषण मंडळ आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या फेस्टिव्हलच्या परिसरात चारही बाजूंनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाज मोजमाप करणारी यंत्रणा बसविली आहे. आयोजकांनी नियम मोडल्यास हा फेस्टिव्हल बंद करण्यात येणार आहे.

प्रसंगी म्युझिक सिस्टीमही जप्त

ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे आढळून आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना असणार आहे. यावेळी तेथे असलेली म्युझिक सिस्टीम जप्त करण्याचीही तयारी या पथकाने ठेवली आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या ठिकाणी आवाज क्षमतेची माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलकही लावला आहे. त्यामुळे सनबर्न आयोजकांना काटेकोरपणे परवान्यातील नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT