police Suspende Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Escape Case: ड्यूटीवर असताना घरी झोपायला गेलेल्या हवालदाराचे निलंबन, सुलेमान पाचव्‍या दिवशीही बेपत्ताच

Sarvesh Kandolkar Suspended: तुरुंगात पहाऱ्यामध्‍ये हलगर्जी केल्‍याचा ठपका ठेवून गुन्‍हा शाखेचा हवालदार सर्वेश कांदोळकर याला निलंबित करण्‍यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भू-बळकाव प्रकरणातील मूळ सूत्रधार सिद्दीकीचा पाचव्‍या दिवशीही शोध लागला नसून, तुरुंगात पहाऱ्यामध्‍ये हलगर्जी केल्‍याचा ठपका ठेवून गुन्‍हा शाखेचा हवालदार सर्वेश कांदोळकर याला निलंबित करण्‍यात आले आहे. सर्वेश ड्युटीवर असताना झोपण्‍यासाठी घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्‍हणजे तो तक्रारदार आहे.

सिद्दीकीच्‍या व्‍हायरल व्‍हिडिओ (Viral Video) प्रकरणी आज सकाळी काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांची दोन तास चौकशी करण्‍यात आली. तद्नंतर सायंकाळी ॲड. अमित पालेकर यांना १९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता जुने गोवे पोलिसांनी चौकशीस उपस्थित राहण्यासंदर्भात समन्‍स बजावण्‍यात आले. विरोधकांनी आपली सतावणूक सुरू असल्‍याचे म्‍हटले आहे. दरम्‍यान, ‘फरारी संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमानचा पोलिस यंत्रणा शोध घेत आहे. व्‍हायरल व्हिडिओचा स्रोत जाणून घेण्यासाठी कवठणकर यांना समन्स बजावण्यात आले होते, असे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी म्‍हटले आहे.

जमीन हडप प्रकरणातील फरारी मुख्य संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने व्हिडिओद्वारे पोलिसांवर आरोप केल्‍याची माहिती मी आधीच पोलिस महासंचालकांना दिली होती.

तपास कामात मदत व्हावी म्हणून ‘तो’ व्हिडिओही पोलिसांना दिला होता. व्हिडिओमध्ये सत्ताधारी आमदार ज्योशुआ तसेच पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता तसेच उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांचा नामोल्‍लेख आहे.

जुने गोवे पोलिसांनी त्यांना समन्स पाठवून चौकशी करण्याऐवजी पोलिसांना व्हिडिओ देऊन मदत करणाऱ्या मलाच चौकशीस बोलावले.

त्यासाठी तीन समन्स व्हॉट्‍सअॅपवर पाठवले. त्‍यावरील तारखा चुकीच्‍या होत्‍या. चौकशीवेळी माझ्या कुटुंबीयाची चौकशी केली, ज्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही.

पोलिसांनी माझा मोबाईल मागितला; मात्र तो मी दिला नाही. व्हिडिओ माझ्या मोबाईलवरून काढण्यात आलेला नव्हता. विरोधकांची गळचेपी सुरू आहे. त्‍या विरोधात आवाज उठवणारच!

उपसभापती ज्‍योशुआ आऊट ऑफ कव्‍हरेज!

भू-बळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खानने व्हिडिओमध्‍ये उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात ज्योशुआ यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ मिळत होता. मागील तीन दिवसांपासून उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT