Goa | Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa: बेती फेरीधक्क्यावरील समस्या त्‍वरित सोडवा- सुभाष फळदेसाई

Goa: नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी बेती येथे उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

दैनिक गोमन्तक

Goa: बेती फेरीधक्क्यावरील समस्या अद्यापही सुटल्या नसल्याने नदीपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी बेती येथे उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तीन महिन्यांच्या आत सर्व कामाची पूर्ती केल्याचा अहवाल सादर करा, असा आदेश त्यांनी यावेळी दिला. त्यावेळी माजी आमदार जयेश नाईक, पंचायत सदस्य संबंधित अधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

बेती जेटीवर प्रवाशांसाठी निवारा बांधण्यात यावा, अशी मागणी गेली कित्येक वर्षे रखडली आहे. याबाबत सरकार दरबारी प्रस्ताव मांडल्याच्या घटनेला 11 वर्षे उलटली. दोन वेळा नवी फाईल तयार करण्यात आली.

तरीही काम सुरू होत नाही, अशी तक्रार स्थानिकांनी करताच मंत्री भडकले. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा काम लगेच सुरु करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. किमान 30 लोक बसतील एवढा निवारा हवा, असे मंत्र्यांनी सांगितले.

बेती जेटीला भेट यापूर्वी कोणत्याच मंत्र्याने दिली नाही, मंत्री फळदेसाई हे पहिले मंत्री आहेत, अशा शब्दात स्थानिक रहिवाशांनी आभार मानले. तीन महिन्याच्या आत समस्या सुटतील असे आश्‍वासन या वेळी मंत्र्यांनी दिले.

एक फेरी भलत्याच ठिकाणी नेली जाते !

वाहन पार्किंगची समस्या होण्याची शक्यता असल्याने 15 लोकांसाठी तूर्त व्यवस्था करू, असे अधिकारी म्हणाले. या ठिकाणी एकच फेरीबोट असते. एका तासाने ती सोडली जाते. दुसरी फेरी आपत्कालीन स्थितीच्या नावाखाली भलत्याच ठिकाणी नेली जाते. हे योग्य नाही. शौचालये आहेत, पण पाणी नाही. या समस्या तात्काळ सुटली पाहिजे, असा आदेश मंत्री फळदेसाई यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

SCROLL FOR NEXT