Subhash Faldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai: खाणी सुरू करण्यासाठी आंदोलन करणारे आयआयटीसाठी रस्त्यावर उतरत नाहीत हीच शोकांतिका

काकोडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Faldesai: राज्यात खनिज खाणी सुरू करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात; पण निसर्गाचे रक्षण करून भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आयआयटी समर्थनार्थ कुणीही रस्त्यावर उतरत नाही, ही एक शोकांतिका असल्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

ते काकोडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कुडचडे पालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक, नगरसेविका योलंडा परेरा, सुदेश राणे, वामन मराठे, विवेक नाईक, विनोद जांबावलीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

बाकी राज्यातून आयपीएस, आयएएस, आयएफएस असे अधिकारी तयार होतात; पण गोव्यातून एकही अधिकारी तयार होत नसल्याने आम्हाला शिक्षण क्षेत्रात बदल करावाच लागेल.

काकोडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे देशातील नामांकित केंद्र असून यातून अनेक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल केले आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

आयआयटी’सारख्या उपक्रमाला विरोध होणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यात ‘आयआयटी’ झाली पाहिजे; कारण आमच्या राज्याला शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी ही संस्था असणे गरजेचे आहे. ‘आयआयटी’ला अवघेच लोक विरोध करतात व त्यांना मी किंमत देत नाही. - सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT