Mopa Goa Street Race Dainik Gomantak
गोवा

Goa Street Race: ‘गोवा स्ट्रीट रेस’मध्ये 3 अपघात! नियोजनात त्रुटी; विदेशी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

Mopa Goa Street Race: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित ‘गोवा स्ट्रीट रेस’ (फॉर्म्युला ४) कार स्पर्धेला शनिवारी (ता.१४) दुपारी प्रारंभ झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित ‘गोवा स्ट्रीट रेस’ (फॉर्म्युला ४) कार स्पर्धेला शनिवारी (ता.१४) दुपारी प्रारंभ झाला. राज्यातील पहिल्याच अशा स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, तीन किरकोळ अपघातांची नोंद झाली.

पहिल्या दोन अपघातांत एका कारने पुढील कारला मागून धडक दिली, तर तिसरा अपघात ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन कारमध्ये झाला. अपघातग्रस्त वाहने तातडीने क्रेनद्वारे हटविण्यात आली.

कार रेससोबत मोटरसायकलस्वारांनी कसरती सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. स्पर्धेमुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा सरकारचा दावा असला तरी विदेशी पर्यटकांची उपस्थिती अल्प होती. दरम्यान, कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. सकाळी होणारा कार्यक्रम दुपारी एक वाजता सुरू झाला. स्वयंसेवकांकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने प्रेक्षकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी कच्च्या रस्त्यांमुळे चिखलाची समस्या जाणवली.

पत्रकारही नाराज

पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या आसनव्यवस्थेबाबतही स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, वृत्तांकन व छायाचित्रणासाठी जागा अपुरी व अडथळायुक्त होती. आयोजकांकडून मात्र यावर समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT