Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Stray Dog Attack: आणखी किती बळी हवेत? दररोज 57 जणांवर होतोय भटक्‍या कुत्र्यांचा हल्ला; अनास्‍थाच कारणीभूत

Stray Dogs Issue Goa: एका बाजूने गोवा स्‍वत:ला देशातील पहिले रेबिजमुक्‍त राज्‍य म्‍हणवून घेत आहे, तर दुसऱ्या बाजूने राज्‍यात भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Sameer Panditrao

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: एका बाजूने गोवा स्‍वत:ला देशातील पहिले रेबिजमुक्‍त राज्‍य म्‍हणवून घेत आहे, तर दुसऱ्या बाजूने राज्‍यात भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका सर्व्हेक्षणानुसार, गोव्‍यात सुमारे ५६ हजार भटकी कुत्री आहेत. दर दिवसाला त्‍यांच्‍याकडून सरासरी ५७ जणांना चावे घेतले जातात.

वास्‍तविक अशा भटक्‍या कुत्र्यांच्‍या वाढीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी सरकारकडून त्‍यांचे निर्बीजीकरण करण्‍याची मोहीमराबविली जाते. मात्र आपल्‍या गावात ही मोहीम राबविण्‍यासाठी आत्तापर्यंत फक्त २७ टक्‍के ग्रामपंचायतींनीच इच्‍छा दाखविली आहे, असे आकडेवारीवरून स्‍पष्‍ट होते.

फोंडा येथे भटक्‍या कुत्र्यांच्‍या हल्‍ल्‍यात एका निष्‍पाप अडीच वर्षीय मुलीला आपला प्राण गमवावा लागला. त्‍यामुळे तिच्‍या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्‍यामुळे आता भटक्‍या कुत्र्यांचा विषय पुन्‍हा ऐरणीवर आला आहे.

एका बाजूने भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या वाढत असताना दुसऱ्या बाजूने त्‍यांच्‍या संख्‍येवर नियंत्रण ठेवण्‍याच्‍या मोहिमेबाबत सगळीकडे अनास्‍थाच दिसून येत आहे.सरकारी आकडेवारीनुसार, गोव्‍यात एकूण १९१ पंचायती असून सुमारे ४०० गावांचा समावेश होतो.

भटक्‍या कुत्र्यांच्‍या संख्‍येवर नियंत्रण आणण्‍यासाठी पंचायतींकडून निर्बीजीकरण मोहीम राबविण्‍याकरिता सरकारकडून निधी दिला जातो. पण या योजनेचा आपल्‍याला लाभ मिळावा यासाठी फक्‍त ५२ पंचायती आणि मोजक्‍याच नगरपालिकांनी अर्ज केले आहेत. ही निर्बीजीकरण मोहीम पंचायती, नगरपालिकांनी एनजीओंद्वारे राबविणे आवश्‍‍यक आहे.

फोंडा तालुक्‍यात अक्षम्‍य दुर्लक्ष

ज्‍या फोंडा तालुक्‍यात काल एका लहान मुलीचा भटक्‍या कुत्र्यांच्‍या हल्‍ल्‍यात बळी गेला, तेथे कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम राबविण्‍यास मोठी अनास्‍था दाखविण्‍यात आलेली आहे. बेतोडा, निरंकाल, कोनशे आणि कोडार या भागात भटक्‍या कुत्र्यांचा संख्‍या वारेमाप वाढली आहे. मात्र स्‍थानिक पंचायतीला ही मोहीम राबविण्‍यासाठी पुरेसा निधी प्राप्‍त न झाल्‍याने ती अडून पडली आहे. या भागात कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्‍यासाठी योग्‍य ती यंत्रणा नाही आणि भटकी कुत्री पकडण्‍यासाठी आवश्‍‍यक मनुष्‍यबळही उपलब्‍ध नसल्‍याचे दिसून आले आहे.

फोंड्यात अडीच वर्षांच्‍या चिमुकलीचे भटक्‍या कुत्र्यांनी लचके तोडले. त्‍यात तिचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे या कुत्र्यांचा विषय पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्‍त केला नाही तर आणखी बळी जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. विशेष म्‍हणजे हे कुत्रे लहान मुलांना लक्ष्‍य करत आहेत. त्‍यामुळे आपल्‍या मुलांकडे लक्ष ठेवणे त्‍यांच्‍या पालकांचीही तेवढीच जबाबदारी ठरते.

फोंडा उपजिल्‍हा इस्‍पितळात दरमहा कुत्र्यांच्‍या चाव्‍याची ८० ते ९० प्रकरणे होतात होतात नोंद.

बाणावली, बेताळभाटी, कोलवा, कळंगुट, मांद्रे या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT