पावसाळी वादळी वाऱ्याने मये केळबाईवाडा येथील एक झाड वीज खांबांवर पडले होते.  Dainik Gomantak
गोवा

Goa : वीज खात्याचा अजब विक्रम; मयेत रात्री 4 तास वीज गायब

वीज (Electricity) अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे (Telephone) संपर्क साधला असता मयेला वीज पुरवठा करणारे फिडर नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमन्तक

मये: मये मतदार संघातील वीजेची (Electricity) समस्या अजून सुटलेली नाही. दिवस असो की रात्र, वारंवार आणि तासंतास वीज गायब होण्याचे प्रकार चालूच आहेत. बुधवारी रात्री चार तास अंधार करून वीज खात्याने मयेत विक्रम नोंदविला.

नवीन फिडर बसवा!

काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांनी मयेतील ग्रामस्थांना सोबत घेऊन डिचोली उपवीजकेंद्राच्या कार्यालयावर मोर्चा काढून वीज अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असा निर्वाळा वीज अधिकाऱ्यांनी मयेवासीयांना दिला होता. परंतु खास करून रात्रीच्या वेळी दुरुस्ती कामाच्या निमित्ताने वीज खंडीत करणे आता नित्याचेच झाले आहे. या रोजच्या कटकटीला लोकही कंटाळलेत. खाण बंदीनंतर काही होत करू तरुणांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेत. अनेक उपकरणे विजेवर चालतात. वारंवार वीज जाण्याने उदीम उद्योगावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. या तरुणांनी संताप व्यक्त केला आहे.

वीज अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता मयेला वीज पुरवठा करणारे फिडर नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते. बुधवारीही मयेवासीयांना दिवाडी फिडर नादुरुस्त झाल्याची सबब सांगण्यात आली. मुसळधार पाऊस, त्यातून चार तास खंडीत प्रवाह. त्यामुळे चोडण ते पोईरा मये परिसरात जीवघेणा अंधार पसरला होता. विजेची जुनी उपकरणे बदलून त्याजागी नवी उपकरणे टाकण्याची मागणी केली जात आहे.

मयेत मान्सूनपूर्व कामेच नाहीत!

ज्या ज्या वेळी वीज गेलेली असते त्या त्या वेळी झाडे, फांद्या किंवा विजेचा खांबच तुटून पडल्याने वीज खात्याने वीज पुरवठा खंडित केला असल्याचे प्रत्ययास येते. वीज खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने मान्सूनपूर्व कामे न केल्याने, आणि या खात्यातील अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे लोकांना नेहमीच गैरसोयींना तोंड द्यावे लागते ही वस्तुस्थिती होय. वीज गायब झाल्यावर लोक वीज कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहतात. परंतु मुळात साधन सुविधाच उपलब्ध नसल्यास ते तरी बिचारे काय करणार? वीज खांबांची दुरुस्ती, नव्या वीज तारा टाकणे, वीज तारांवरील फांद्या छाटून टाकणे, खराब झालेले फ्यूज बदलून त्या जागी नवे फ्यूज टाकणे ही पावसा आधीची कामे सरकारने हाती न घेतल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मये गावी अनेक ठिकाणी झाडे रस्त्यात कललेली पाहायला मिळतात. वीज तारा अन विजेच्या खांबांना सोबत घेऊन ती कोणत्याही क्षणी रस्त्यात कोसळू शकतात. भरमसाठ बिले भरायची, पण अखंड वीज सेवा मात्र द्यायची नाही, या प्रकाराने मयेवासी संतप्त बनलेत. येत्या निवडणुकांच्या प्रचारासाठी सत्ताधारी दारोदारी भेट देतील, त्यावेळी त्यांना प्रश्नांचा शॉक देण्याची तयारी मयेवासीयांनी चालविली आहे.

शासन निष्क्रीय असले तरी नागरीक जागृत असल्याचे दिसून आले. पावसाळी वादळी वाऱ्याने मये केळबाईवाडा येथील एक झाड वीज खांबांवर पडले होते. झाडाखालून वीज तारा गेल्याने ते मनुष्यबळी घेण्याची भीती होती. स्थानिक रहिवासी माधवी आरोंदेकर यांनी धोकादायक बनलेले हे झाड कापण्याची पंचायतीला विनंती केली. त्याची त्वरित दखल घेत सरपंच सीमा आरोंदेकर यांनी ते कापूनही घेतले. अघटित घटना घडू नये याची खबरदारी घेत अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT