Goa: ओढ गणरायाची...मूर्तिकार गणेशमूर्ती घडविण्यात मग्न

यंदा 220 मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे दीपक गावकर यांनी सांगितले. मूर्ती साठीची माती माडेल थिवी येथून विकत आणून ते दरवर्षी गणेशमूर्ती (Ganeshmurti) तयार करतात.
गावकरवाडा होंडा सत्तरी येथील मूर्तिकार दीपक गावकर हे सध्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविण्यात गढून गेले आहेत.
गावकरवाडा होंडा सत्तरी येथील मूर्तिकार दीपक गावकर हे सध्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविण्यात गढून गेले आहेत.Dainik Gomantak
Published on
Updated on

हिंदू धर्मातील सणांचा राजा म्हटले जाणारा गणेशोत्सव (Ganeshotsav) जवळ आला आहे. गावकरवाडा होंडा सत्तरी येथील मूर्तिकार (Sculptor) दीपक गावकर हे सध्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविण्यात गढून गेले आहेत. त्यांना त्यांच्या घरातील चिमुकली मुलेही मदत करत आहेत. यंदा 220 मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे दीपक गावकर यांनी सांगितले. मूर्ती साठीची माती माडेल थिवी येथून विकत आणून ते दरवर्षी गणेशमूर्ती तयार करतात. गावकर हे एक उत्कृष्ट चित्रकार असून त्यांच्या निसर्ग चित्रांना मोठी मागणी आहे. उत्कृष्ट वॉल (भिंती) पेंटर म्हणून त्यांना ओळखले जाते. पाऊस असल्याने मूर्ती वाळण्यास वेळ लागत आहे. मूर्ती वाळल्यानंतर त्यांचे रंगकाम करणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

गावकरवाडा होंडा सत्तरी येथील मूर्तिकार दीपक गावकर हे सध्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविण्यात गढून गेले आहेत.
Goa: डिचोली येथे मगरीला अखेर जीवनदान...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com