Goa vegetable rates Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Goa agriculture import: कृषी क्षेत्रात गोव्‍याला आत्‍मनिर्भर करण्‍याचे ध्‍येय मुख्‍यमंत्री सावंत यांनी डोळ्‍यासमोर ठेवले असले तरी अजूनही गोव्‍याला कर्नाटक व महाराष्‍ट्रावरच अवलंबून रहावे लागत आहे.

Sameer Panditrao

मडगाव: कृषी क्षेत्रात गोव्‍याला आत्‍मनिर्भर करण्‍याचे ध्‍येय मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी डोळ्‍यासमोर ठेवले असले तरी अजूनही कृषी मालासाठी गोव्‍याला कर्नाटक व महाराष्‍ट्रावरच अवलंबून रहावे लागत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात गोव्‍याने १३,४७१.०५ टन कांदा तर १२,१७९ टन बटाट्याची आयात केली आहे.

आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी विचारलेल्‍या एका प्रश्‍नावर कृषिमंत्री रवी नाईक यांनी उत्तर देताना, गोव्‍यात लागणारी भाजी आणि गोव्‍यात तयार होणारी भाजी या दोन्‍हीमध्‍ये तब्‍बल २०,६३९ मेट्रिक टनची तफावत असून गोव्‍यात येणारा बहुतेक कृषी माल कर्नाटक व महाराष्‍ट्रातून आयात केला जातो, असे या उत्तरात म्‍हटले आहे.

गोव्‍यात ४९ प्रकाराच्या भाज्‍या आणि इतर उत्‍पादने आयात केली जात आहेत. त्‍यात वांगी, काकडी, शेवग्‍याच्‍या शेंगा आणि लसूण यांचाही कमी प्रमाणात का होईना पण समावेश असल्‍याचे कृषी मंत्र्यांनी आपल्‍या उत्तरात म्‍हटले आहे. २०२४-२५ या वर्षात गोव्‍यात १.१ लाख टन भाज्‍या उत्‍पादित केल्‍या असून त्‍यात वांगी, मिरच्‍या, काकडी यांचा प्रामुख्‍याने समावेश आहे. गोव्‍यात ८,८६३ हेक्‍टर जमिनीत भाजीची लागवड केली जात असून हे उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्‍या आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

राज्यातील काही भागात शेती व्यवसाय केला जातो. भाजीही पिकवली जाते, पण उत्पादन कमी होते. युवा वर्गाने शेतीकडे वळले पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घ्यायला हवा. हंगमानुसार शेती केल्यास काही प्रमाणात भाजीचे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे. येथील हवामानानुसार भाजीचे उत्पादन घ्यायला हवे.

कर्नाटक, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भाजी, टोमॅटो, बटाट्याचे उत्पादन होते, त्या प्रमाणात गोव्यात होणार नाही, पण ज्या भागात जी पिके घेणे शक्य आहे, ती घेतली पाहिजे, तरच काही प्रमाणात बाहेरीर राज्यावर कृषी मालासाठी असलेले अवलंबित्व कमी होईल, असे येथील काही ज्येष्ठ शेतकऱ्यांचे मत आहे.

४३३७ टन टोमॅटो!

गोव्‍यात भाजी मालाची जी आयात केली जाते, त्‍यात ४३३७ टन टोमॅटो, १२५५ टन कोबी, ११५३ टन सुक्‍या मिरच्‍या, ७७१ टन गाजर, ६६१ टन हिरव्‍या मिरच्‍या तर ६०७ टन कॉली फ्‍लॉवरचा समावेश असल्‍याचे या उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT