Award

Teacher 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोवा राज्य शिक्षक पुरस्काराचे वितरण 20 तारखेला होणार

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि सभापती राजेश पाटणेकर यांची उपस्थिती असणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्काराचे वितरण 20 रोजी सकाळी 10 वा. गोवा विद्यापीठाच्या (Goa University) मल्‍टिपर्पज अ‍ॅडोटोरियम न्यू सायन्स फॅकल्टी, स्कूल ऑफ केमिकल सायन्स कॅम्पसमध्ये होणार आहे.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्याहस्ते शिक्षकांना 20 रोजी गौरविण्यात येईल. कोविड-19 (COVID-19) महामारीमुळे विलंब झालेला हा सोहळा 20 डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. कोविड महामारी काळातही शिक्षकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. लसीकरण केंद्रावर काही शिक्षकांना तैनात केले आहे. सध्‍या निवडणूक मोहिमेचीही जबाबदारी त्‍यांच्‍यावर सोपविली आहे.

असा आहे उद्देश

गोव्याला नॉलेज हब बनविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे ओळखून उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्रतिभावान आणि समर्पित शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने राज्य शिक्षक (Teacher) पुरस्काराची (Award) आखणी केलेली आहे. या पुरस्कारामुळे राज्यातील शिक्षकांच्या पुढच्या पिढीला ज्ञानावर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळेल, या उद्देशापोटी हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

असे आहे पुरस्काराचे स्वरूप

दरवर्षी उच्च शिक्षणात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांची निवड राज्य शिक्षक पुरस्कारासाठी केली जाते. 1लाख रुपये, प्रशस्‍तिपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT