Hrishikesh Dhavalikar | Zee Marathi Sa Re Ga Ma Pa Lil Champs 2023
Hrishikesh Dhavalikar | Zee Marathi Sa Re Ga Ma Pa Lil Champs 2023 Dainik Gomantak
गोवा

Zee Marathi: आजोबांकडून घेऊन संगीताचा वारसा, 'सारेगमप' च्या मंचावर पोहोचला गोमंतकीय आवाज

Vinayak Samant

Zee Marathi Sa Re Ga Ma Pa Lil Champs 2023: गोमंतक ही कलाकारांची खाण आहे असे म्हटले जाते. या भूमीने कला क्षेत्राला विविध रत्ने दिली आहेत.

सर्वांना आपल्या संगीताने भुरळ घालणारे मंगेशकर कुटुंबीय याच मातीतले. पं. जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, हेमा सरदेसाई अशा महारथींनी संगीत क्षेत्रात गोव्याचे नाव मोठे केले आहे.

सध्या झी मराठी चॅनेलवर चालू असलेल्या 'सारेगमप लिटल चॅम्पस्' संगीत रियालिटी शोमध्ये देशभरातून निवडलेल्या १०० स्पर्धकांची चाचणी घेतल्यावर, ३० स्पर्धक निवडण्यात आले.

या सर्व स्पर्धकांना प्रत्यक्ष स्टुडिओ मध्ये सुप्रसिद्ध गायक-संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी, सुप्रसिद्ध गायिका सौ. वैशाली माडे व महागुरू पं. सुरेश वाडकर यांच्यासमोर गाण्याची संधी मिळाली.

यापैकी अंतिम १२ स्पर्धकांना झी मराठीच्या सारेगमप लिटल चॅम्पस् च्या ‘गुरुकुल’ मध्ये प्रवेश देण्यात आला. जिथे त्यांना या दिग्गज कालाकारांकडून शिकण्याची संधी प्राप्त झाली.

या अंतिम स्पर्धकांमध्ये गोव्याच्या केशव बळिराम हेडगेवार विध्यालयातील ९ वी इयत्तेत शिकणाऱ्या हृषीकेश ढवळीकर ची वर्णी लागली ही समस्त गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

ढवळी फोंडा येथील संगीतमय परिवारात हृषीकेशचा जन्म झाला. आजोबा संगीतकार-गायक श्री. गो.रा.ढवळीकर यांच्याकडून त्याला संगीताचा वारसा प्राप्त झाला.

त्याचे वडील नितीन ढवळीकर हे स्वतः उत्तम शास्त्रीय गायक आहेत. वयाच्या ७ व्या वर्षांपासून तो शास्त्रीय संगीताचा अभ्यास करीत आहे.

सुरवातीला गोव्याची सुप्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा गांवकर सायनेकर ह्यांच्याकडून ५ वर्षे मार्गदर्शन घेतले असून आता सध्या तो आपले वडील आणि शास्त्रीय गायिका प्राची जठार यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय गायन तसेच शिवानी मारूलकर-दसककर यांच्याकडून ठुमरी वादनाचे प्रशिक्षण घेत आहे.

लहान वयातच हृषीकेश ने खयाल गायनामध्ये आपला ठसा उमटवित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रतियोगीतांमध्ये यश संपादन केले आहे. शास्त्रीय संगीतासोबतच सुगम संगीत गाण्यातदेखील त्याचा हातखंडा आहे.

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ह्या सारेगमप लिटल चॅम्पस् मधील हृषीकेशची वाटचाल उल्लेखनीय आहे.

त्याने शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, चित्रपटगीते, लोकसंगीत, लावणी, पाश्चात्य संगीत असे सर्व गितप्रकार तितक्याच ताकदीने सादर करून परीक्षकांची प्रशंसा मिळविली आहे.

येत्या आठवड्यापासून दूरध्वनी वरून मतदान सुरू होणार आणि अंतिम फेरीतील प्रवेशासाठी श्रोत्यांचा पाठिंबा महत्वाचा आहे.

सर्व गोवेकर रसिकांनी भरगोस मतदान करून हृषीकेश ला पाठिंबा द्यावा असे आवाहान त्याचा कुटुंबियांनी केले आहे.

" हृषीकेशमध्ये जन्मतःच प्रचंड सांगीतिक गुण आहे. त्याला जे शिकवले जाते ते लगेच एकपाठी शिष्या प्रामाणे आत्मसात करतो. तान, सरगम आणि पक्के सुर ही त्याचा गायकी मधील वैशिष्ट्ये आहेत. गाण्यातील प्रत्येक जागा, हरकत, मुर्की तो अगदी लीलया म्हणतो ही त्याची खासियत. तालप्रधान गायकीवर त्याचा जास्त प्रभाव दिसून येतो. आता सारेगमप लिटल चॅम्पस् मुळे त्याचा शब्दप्रधान गायकी, भावप्रधान गायकी देखील बहरत चालली असून तो एक परिपूर्ण गायक म्हणून समोर येऊ लागला आहे याचा एक गुरु म्हणून अभिमान वाटतो. त्याचा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा"   
सौ. मुग्धा गांवकर सायनेकर, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT