Anant Chaturdashi Puja Dainik Gomantak
गोवा

Anant Chaturdashi : हे व्रत करा आणि मिळवा गतवैभव

Vinayak Samant

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्दशीला ‘अनंत चतुर्दशी’ म्हणतात. ज्याचा अंत नाही तो ‘अनंत’ आणि 'चतुर्दशी' म्हणजे चैतन्यरूपी शक्ति. या दिवशी शेषनागावर शयनावस्तेत असलेल्या भगवान विष्णूच्या प्रतिमेची पूजा करतात आणि अनंताचे व्रत करतात. या व्रतचा कालावधी १४ वर्षांचा असतो.

अनंत चतुर्दशीचे व्रत सर्वत्र केले जात नाही. फक्त कोणी उपदेश केल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडला तरच हे व्रत घेतात आणि मग ते कुटुंबानुसार अखंड चालू राहते. आपल्यावर आले संकट दूर होऊन परत गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सलग चौदा वर्षे चौदा गाठी असलेला रेशमी दोरा ‘अनंत’ मानून हे व्रत केले जाते.

महाभारतात पांडव द्यूतात हरल्यावर त्यांना १२ वर्षेांचा वनवास आणि १ वर्षेाचा अज्ञातवास भोगावा लागला होता. नंतर या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना हे व्रत करण्याचा उपदेश केला होता अशी कथा आहे. भगवान विष्णुला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यामुनेचेही पूजन करतात.

पूजेच्या दिवशी एक चौरंग घेऊन त्यावर सर्वतोभद्र मंडल काढले जाते. त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवून अष्टदल काढतात. त्या कलशावर दर्भाच्या अंकुराने युक्त सात फणांचा शेषनाग ठेवून त्यापुढे हळदीने रंगविलेला व चौदा गाठी असलेला रेशमी दोरा ठेवला जातो. तांब्याच्या कलशाला वस्त्राने सजवतात आणि त्यातील पाण्याला ‘यमुना’ म्हणून पूजतात.

शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर भगवान विष्णूच्या प्रतिमेची षोडोपचार पूजा केली जाते. यामध्ये अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा नानाविध अंगभूत पूजेंचा यात समावेश असतो. पुष्पांजली झाल्यावर लगेच अर्घ्य देऊन रेशमी दोऱ्याची प्रार्थना करतात.

नंतर तो चौदा गाठी असलेला दोरा यजमानाच्या हातात कींवा गळ्यात बांधला जातो आणि जुन्या दोऱ्याचे विसर्जन केले जाते.

या व्रताला वडे आणि भोपळ्याचे घारगे यांचा नैवैद्य दाखविला जातो आणि व्रत देवतांचे विसर्जन करून या व्रताची सांगता केली जाते. जैन धर्मात सुद्धा या व्रतांचे महत्व सांगितले गेले आहे. ‘अनंत चतुर्दशी’ च्या दिवशी सर्वत्र गणपती विसर्जन केले जाते. परंतु या दिवसाच्या व्रताचे महत्व पटवून देणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT