Goa Tourism: गोव्याला मागे टाकून वाराणसी नंबर वन! पर्यटकांच्या संख्येत मारली बाजी...

World Tourism Day 2023: पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ बनतोय देशातील आघाडीचे टुरिस्ट डेस्टिनेशन
Varanasi Surpassed Goa in Tourist Numbers :
Varanasi Surpassed Goa in Tourist Numbers : Dainik Gomantak
Published on
Updated on

Varanasi Surpassed Goa in Tourist Numbers : काशी, बनारस या नावांनीही परिचित असलेल्या, मंदिरांचे शहर अशी ओळख असलेल्या वाराणसी शहराने पर्यटकांच्या पसंतीत आता अव्वल स्थान पटकावले आहे.

पर्यटनात या शहराने तामिळनाडू आणि गोव्यालाही मागे टाकले आहे. पर्यटन विभागाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

सन 2023 मध्ये आतापर्यंत जवळपास 12 कोटी देशी पर्यटकांनी काशीला भेट दिली आहे. काशीची भव्यता पाहण्यासाठी पर्यटका यंदा मोठ्या संख्येने आले. बाबा विश्वनाथ कॉरिडॉर, काशी घाट आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासामुळेच पर्यटक मोठ्या संख्येने काशीला आले आहेत.

आगामी काळात पर्यटन विभाग येथील शूलटंकेश्वर मंदिराचा विकास करणार आहे. त्यानंतर पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे पर्यटन विभागाचे मत आहे.

12 कोटी पर्यटक आले

पर्यटन विभागाचे उपसंचालक आर. के. रावत म्हणतात की, काशीच्या पर्यटन उद्योगाने तामिळनाडू आणि गोव्याला मागे टाकले आहे. 2022 मध्ये पर्यटकांच्या बाबतीत तामिळनाडू आणि गोवा पुढे होते, पण यावर्षी काशी आघाडीवर आहे.

काशीमध्ये गोव्याहून 20 टक्के अधिक तर तामिळनाडूहून 25 टक्के हून अधिक पर्यटक वाढले आहेत. असेच पर्यटक येत राहिले तर काशी हे पर्यटकांचे सर्वोत्तम ठिकाण बनेल.

Varanasi Surpassed Goa in Tourist Numbers :
Bharat Gaurav Tourist Train: गोव्याला येणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेन; 28 सप्टेंबरला मदुराईतून सुटणार...

अॅडव्हेंचर थीमवर लक्ष

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पर्यटक काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि गंगा घाटाची भव्यता पाहण्यासाठी येत असत. याशिवाय काही नवीन ठिकाणेही पर्यटकांसाठी विकसित करण्यात येणार आहेत.

यामध्ये शूलटंकेश्वर आणि चंदौली या वनक्षेत्रातील साहसी ठिकाणांचा समावेश आहे. ही ठिकाणे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स थीमवर विकसित केली जाणार आहेत. शूलटंकेश्वर येथे नवीन घाट, अ‍ॅप्रोच लाईट आणि गेट बांधण्यात येणार आहे. कारण तिथे पर्यटक मोठ्या संख्येने जातात.

पर्यटन उद्योगात आणखी भर पडेल

पर्यटक दर्शन आणि पूजेसह गंगेत स्नान करतात, क्रुझमधून गंगेचा घाट पाहतात. बुद्धांच्या पहिल्या उपदेशाचे ठिकाण सारनाथलाही भेट देतात.

भव्य, दिव्य आणि नवीन अशा काशीचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व देश आणि जगाने आता ओळखले आहे. देव दिवाळीच्या सणासाठी पर्यटकांचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

Varanasi Surpassed Goa in Tourist Numbers :
Colvale Police News: चिप्सच्या पाकिटावरून दोन गटांत राडा; जोरदार मारामारी, थिवी येथील प्रकार

पर्यटकांची पहिली पसंती

काशी विश्वनाथ धाम, बीएचयू विश्वनाथ मंदिर, दशाश्वमेध घाट, अस्सी घाट, मणिकर्णिका घाट, मान मंदिर घाट, दुर्गाकुंड मंदिर, नमो घाट, तुळशी मानस मंदिर, नेपाळी मंदिर ललिता घाट, संकट मोचन मंदिर, मृत्युंजय महादेव मंदिर, टीएफसी, सारनाथ, शूलटंकेश्वर यासह अनेक मंदिरांना पर्यटक भेट देत असतात.

वाराणसीत पर्यटकांसाठी आता शूलटंकेश्वर मंदिर विकसित केले जात आहे. अॅप्रोच लायटिंग, बेंचेस, पर्यटकांसाठी निवासस्थाने बनवली जात आहेत. अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये हॉट एअर बलून, बोट रेसिंग नियमित केले जाणार आहे.

शास्त्री घाटाचाही विकास करण्यात येत आहे. काशीच्या पर्यटनाने गोवा आणि तामिळनाडूलाही मागे टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com