Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

Goa School Jihad: राज्यातील 'स्कूल जिहाद' प्रकरण नेमकं काय आहे?

स्कूल जिहादचा आरोप होत असलेल्या गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात नेमकं काय घडलं?

Vinayak Samant

गोव्यात शालेय विद्यार्थ्यांना इस्लामिक शिबिरासाठी घेऊन जात मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडले. असा आरोप हिंदू संघटनांनी केल्यानंतर विद्यालय व्यवस्थापन समितिने मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

यासर्व प्रकरणाला हिंदू संघटनांनी स्कूल जिहाद म्हटले आहे. दक्षिण गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील एका प्रकरणाने राज्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायजेशन’ (SIO) या संघटनेने दक्षिण गोव्यातील एक उच्चमाध्यमिक आणि सरकारी विद्यालयातील विद्यार्थ्यांची दाबोळीतील एका मशिदीला भेट आयोजित केली होती.

त्यानंतर मशिदीत गेलेल्या काही विद्यार्थ्यीनींना हिजाब घालण्याची सक्ती केल्याचा आरोप करून काही हिंदुत्ववादी संघटनांनी ह्या भेटीवर आक्षेप घेत प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी केली. काही पालकांतूनही तशी मागणी झाल्याचे सांगण्यात येते.

विद्यालय व्यवस्थापन समितीने त्यानंतर प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई केली. तथापि, आता आजी आणि माजी विद्यार्थी प्राचार्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले आहेत.

दहा वर्षांपासून उपक्रम

पेडणे पासून काणकोणपर्यंत SIO ही संघटना अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षांपासून विविध मशिदींमध्ये भेट देण्यासाठी घेऊन जाते. या मागे धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपला जावा, तसेच विद्यार्थ्यांना इतर धर्माची माहिती व्हावी हा उद्देश असतो.

असे संघटनेचे म्हणणे आहे आणि या आधी अशा भेटी झालेल्या आहेत. पण त्यावेळी कधीच असे फोटो व्हायरल झाल्याचे प्रकार घडले नव्हते, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, इस्लाम धर्मात हिजाब ला खूप महत्व आहे. फक्त डोक झाकणे याला ‘हिजाब’ म्हणतात. पण कालांतराने पुरुषप्रधान मानसिकतेतून पुरुषांनी परस्त्रीकडे बघू नये यासाठी स्त्रियांनी संपूर्ण शरीर झाकण्याचा प्रकार सुरू झाला, असे सांगितले जाते.

ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला त्यांचा आरोप आहे की, SIO ही संघटना PIF या भारतातील वादग्रस्त संघटनेशी जोडली गेलेली असून समाजकार्याआडून ती संघटना विद्यार्थ्यांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त करते. त्यातून लव्ह जिहाद सारखी प्रकरणे समोर येत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

याबाबत बोलताना केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोरगावकर म्हणाले की, “कुठल्याच शैक्षणिक संस्थेने धर्मामध्ये भेदभाव करू नये. जर असे घडले तर पुढच्या पिढीचे शिक्षण रसातळाला जाण्याची शक्यता आहे.

गेली 35 वर्षे विद्यालय सांभाळताना आपण कधीच हिंदू , मुस्लिम, ख्रिश्चन असा भेदभाव केला नाही. मशिदीत गेलेल्या विद्यार्थ्यांनी हिजाब न घालता फक्त डोक्यावरून ओढणी घेतली होती. विद्यार्थ्यांना फक्त इतर धर्मांची माहिती मिळावी, या उद्देशाने मुलांना तिथे नेले होते. त्यामागे त्यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्याचा उद्देश नव्हता.,”

तर राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई म्हणाले की, “या लोकांचा गेल्या दहा वर्षापासून विविध शाळांमध्ये संपर्क आहे. त्यांचे खरं काम जिहाद पसरवणे आहे. ज्या विद्यालयाच्या प्राचार्यांना त्यांचे खरे रूप माहिती नाही, ते अशा प्रकरणाला बळी पडतात.

पण शिक्षण खात्याच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणे चुकीचे आहे. यामागे कुणाचा हात आहे, याची कसून चौकशी झाली पाहिजे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT