Loan Dainik Gomantak
गोवा

Goa State Loan: गोव्यावर 33957 कोटींपेक्षा अधिक कर्ज! CM सावंत यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

Goa State Debt: ज्‍यादा व्‍याजदराच्‍या कर्जांची पुनर्रचना करण्‍यात आली असून, ती आठ टक्‍के व्‍याजदराखाली आणली गेली आहेत. राज्‍य सरकार केंद्राकडून सध्‍या कमी मर्यादेपर्यंतचेच कर्ज घेत आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यावर ३१ मार्च २०२५ पर्यंत ३३,९५७ कोटींपेक्षा अधिक कर्ज असल्‍याचे आणि गेल्‍या दहा वर्षांच्‍या काळात राज्‍य सरकारने केंद्र सरकार आणि खुल्‍या बाजारातून ११,५८१ कोटींपेक्षा अधिक कर्जे घेतल्‍याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांनी विचारलेल्‍या दोन वेगवेगळ्या लेखी प्रश्‍नांच्‍या उत्तरात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

३१ मार्च २०२५ पर्यंत किती कर्ज थकित आहे, सरकार खुल्‍या बाजारातून कोणा-कोणाकडून कर्ज घेते आणि कर्जाचा बोजा कमी करण्‍यासाठी वित्त खाते कशाप्रकारे प्रयत्‍न करीत आहे, असे प्रश्‍न व्‍हेंझी यांनी विचारले होते. त्‍यावरील उत्तरात ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्‍यावर ३३,९५७ कोटींपेक्षा अधिक कर्ज असल्‍याचे नमूद केले आहे.

ज्‍यादा व्‍याजदराच्‍या कर्जांची पुनर्रचना करण्‍यात आली असून, ती आठ टक्‍के व्‍याजदराखाली आणली गेली आहेत. राज्‍य सरकार केंद्राकडून सध्‍या कमी मर्यादेपर्यंतचेच कर्ज घेत आहे.

याशिवाय भांडवली कामांसाठी केंद्र सरकारकडून ५० वर्षांसाठी बिनव्‍याजी कर्ज मिळते. त्‍यावर अधिक भर देऊन राज्‍यावरील कर्ज कमी करण्‍याचे प्रयत्‍न सरकारकडून सुरू आहेत, असे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हटले आहे. दरम्‍यान, खुल्‍या बाजारातून सरकार नाबार्ड, आर्थिक विकास महामंडळ तसेच लघुउद्योग विकास बँक ऑफ इंडिया (एसआयडीबीआय) यांच्‍याकडून प्रामुख्‍याने कर्ज घेत असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT