IMF Pakistan Loan: दहशतवाद्यांच्या मदतीसाठी कर्जाचा गैरवापर, पाकिस्तानला ‘आयएमएफ’कडून निधी मंजुरी; भारताची चिंता

Pakistan Gets IMF Loan: ‘आयएमएफ’च्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि निधीसाठी घेतलेल्या मतदानात भाग घेतला नाही.
IMF Pakistan
IMF funding during international conflictsDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारत -पाकिस्तानमधील संघर्षाच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) विस्तारित निधी सुविधांतर्गत (ईएफएफ) पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे कर्ज शुक्रवारी (ता.९) मंजूर केल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे.

‘आयएमएफ’च्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि निधीसाठी घेतलेल्या मतदानात भाग घेतला नाही. ‘सीमेपलीकडे दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी पाकिस्तान या निधीचा गैरवापर करण्याचा शक्यता भारताने संघटनेकडे व्यक्त केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये, म्हटले आहे की पाकिस्तानचे पूर्वीचा कामगिरी खराब असताना त्यांना नवे कर्ज दिल्यास भारत एक जबाबदार सदस्य म्हणून ‘आयएमएफ’च्या क्षमतेवर चिंता व्यक्त करतो. तसेच तसेच सीमापार दहशतवादासाठी पाकिस्तान या कर्जनिधीचा गैरवापर करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काल विस्तारित निधी सुविधांतर्गत पाकिस्तानला सुमारे एक अब्ज डॉलरचे कर्ज तत्काळ वाटप करण्यास मंजुरी दिल्यानंतर भारताने तातडीने त्यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. संघटनेने निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या कार्यकारी मंडळाने ‘ईएफएफ’अंतर्गत पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचा प्रारंभिक आढावा घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे एक अब्ज डॉलर तत्काळ वितरण करण्याची परवानगी देत आहे. यामुळे या व्यवस्थेअंतर्गत एकूण २.१ अब्ज डॉलर वितरण करण्यात येईल.

भारताविरोधी निर्णय

‘आएमएफ’ने पाकिस्तानला गेल्या ३५ वर्षांत २८ वेळा कर्ज मंजूर केले

गेल्या पाच वर्षांत चार

योजनांतर्गत कर्ज

India Pakistan War Tension 2025
India Pakistan Tension Dainik Gomantak

जागतिक समुदायाला धोक्याचा संदेश

सीमापार दहशतवादाला पाकिस्तानकडून कायम समर्थन हे जागतिक समुदायाला धोक्याचा संदेश आहे. कर्जपुरवठादार संस्था आणि देणगीदारांना प्रतिष्ठेला धक्का पोहोचून जागतिक मूल्यांची थट्टा करण्यासारखे आहे, असे अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

IMF Pakistan
Balochistan: स्वतंत्र 'बलुचिस्तान’! सोशल मीडियावर मागणीचा संदेश Viral; मोठ्या भागावर ताब्याचा दावा

शरीफ यांना समाधान

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला १ अब्ज डॉलरच्या मदत मंजूर केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान महंमद शहबाज शरीफ यांनी समाधान व्यक्त केले करतात,” असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारली असून देश विकासाच्या वाटेवर आहे, असेही त्यात म्हटले आहे.

IMF Pakistan
India Pakistan War: भारताकडून पाकिस्तानचे 'आठ' एअरबेस आणि लष्करी तळांवर हल्ला; भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित

आश्‍चर्यकारक निर्णय : अब्दुल्ला

जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ‘आयएमएफ’चा निषेध केला आहे. ‘पूँच, राजौरी, उरी, तंगधर आणि इतर अनेक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रास्त्रांची भरपाई ‘आयएमएफ’ जेव्हा पाकिस्तानला करेल तेव्हा उपखंडातील सध्याचा तणाव कमी होईल, असे या ‘आंतरराष्ट्रीय समुदायाला’ कसे वाटू शकते?,’ असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com