Goa Drone Policy | Goa Government's Drone Policy 2022  Dainik Gomantak
गोवा

Goa Drone Policy : गोवा मुक्तिदिनी राज्य सरकारचे गोमंतकीयांना मोठं गिफ्ट; ड्रोन पॉलिसीद्वारे मिळणार 'या' सुविधा

गोवा राज्याला मोठी किनारपट्टी लाभल्याने किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरु शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drone Policy 2022: तंत्राज्ञानाचा अवलंब करत गोमंतकीयांचे जीवन आणखी सुखकर करण्यासाठी गोवा सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. सरकारने आज गोवा मुक्तिदिनी 'ड्रोन धोरण 2022' जारी केले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ड्रोन धोरण व अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग हबचे उद्घाटन केले.

भविष्यात सुरक्षेसाठी आणि सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. गोवा राज्याला मोठी किनारपट्टी लाभल्याने किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरु शकतो. वैद्यकीय उपकरणे, प्रोटोटाइप डिझाइन्सच्या थ्रीडी प्रिंटिंगसाठी गोवा शेजारील राज्यांवर अवलंबून नाही अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

प्रत्येक घरांघरात फायबर लवकरच प्रत्यक्षात येईल. फायबरमुळे 12 तालुके, 191 ग्रामपंचायती आणि 228 ग्रामस्थ जोडले जाणार आहेत. तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश नंतर ड्रोन धोरण जारी करणारे गोवा हे तिसरे राज्य ठरले आहे. 3D प्रिंटिंगमुळे उत्पादन क्षेत्र तसेच स्टार्ट अप्सना मदत होईल असा विश्वास माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT