Pernem : गोवा खरचं मुक्त झालाय का? पाण्याअभावी पेडणे नागरिक संतापले

पंतप्रधान गोवा दौऱ्यावर असताना सर्व सुरळीत होतं
Pernem
PernemDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्याचा 62 वा मुक्तीदिन आज उत्साहात साजरा करण्यात आला, असे असले तरी पेडणे येथील सुरबानवाडा परिसरात पाण्याअभावी नागरीकांची भटकंती सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी आज संताप व्यक्त केला.

(citizens are angry because the tap is not drinking water at Surbanwada Pernem)

Pernem
INS Mormugao : आयएनएस मुरगाव देशाची किनारपट्टी अधिक सुरक्षित

याबाबत माहिती देताना सुरबानवाडा येथील नागरीक महेंद्र तुकाराम तांबोसकर म्हणाले की, आज गोवा मुक्तीदिन आहे. गोवा स्वातंत्र्य होऊन 61 वर्षे पुर्ण झाली तरीही नागरीकांना पाण्यासारखी मुलभूत सुविधा मिळू शकत नाही. हे आम्हाला खेदाने सांगावे लागत आहे. पाणी पुरवठा अधिकारी संदिप मोरस्कर यांना अनेकदा जाऊन भेटलो, मात्र तरी ही समस्या कायम असल्याचं यावेळी नागरीकांनी म्हटले .

Pernem
Dabolim Airport : दाबोळी विमानतळाचं भवितव्य काय? वाहतूक मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आले होते, त्या दरम्यान आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र आता स्थिती जैसे थे आहे. पाण्यासाठी नागरीकांची पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे. तसेच वीज पुरवठ्याचा प्रश्न ही तसाच आहे. माध्यमांनी बातम्या लावल्या की, दहा दिवस सुव्यवस्थित सुरु असते. मात्र पुन्हा प्रश्न जैसे थे होतात असे तांबोसकर म्हणाले.

या प्रश्नावरुन आम्ही स्थानिक आमदारांकडे ही गेलो होतो, मात्र तरीही हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे या प्रश्नावरुन आम्ही दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न त्यांनी हताशपणे विचारला. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर संबंधित विभागाने सोडवावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com