Sun Tan Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात नोव्हेंबरमध्ये 'घामाच्या धारा'! तापमान 33.5 अंशांवर; थंडी गेली कुठे?

Goa Weather Update: ऐन हिवाळ्यात तापमानाचा पारा मात्र वाढत असून राज्यात कमाल तापमानाचा पारा ३३.५ अंशांवर पोचला आहे. राज्यात ९७ टक्के इतक्या आर्द्रतेची नोंद करण्यात आली असून जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत अधिक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Winter Delay Goa Records High Temperatures in Mid-Season

पणजी: राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून थंडीला सुरुवात होत असे, परंतु यंदा अजूनही थंडीचा थांगपत्ता नाही. परंतु ऐन हिवाळ्यात तापमानाचा पारा मात्र वाढत असून राज्यात कमाल तापमानाचा पारा ३३.५ अंशांवर पोचला आहे. राज्यात ९७ टक्के इतक्या आर्द्रतेची नोंद करण्यात आली असून जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत अधिक आहे.

दोन दिवसात कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मॉन्सूनोत्तर पाऊस संपल्यामुळे धुके पडायला सुरुवात होते व त्यानंतर थंडीला सुरुवात होत असे. परंतु यंदा अजूनही थंडीचा थांगपत्ता नाही. अजूनही राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. राज्यात मागील दोन-तीन वर्षांत हवामानात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. बदलत्या हवामानाचा पॅटर्नबाबत हवामानतज्ञ चिंता व्यक्त करत असून जर हवामानातील हे बदल कायम राहिले, तर मात्र ते धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

मॉन्सूनोत्तर १३.७९ पाऊस

राज्यात आतापर्यंत एकूण ३५०.४ मिमी म्हणजेच १३.७९ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. जी सरासरी मॉन्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत तब्बल १०४.४ टक्के अधिक आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला पाऊस, उष्मा आदी गोष्टी चिंताजनक आहेत.

राज्यात सध्याच्या स्थितीत आकाश मोकळे आहे, मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढली आहे. त्यासोबतच वाऱ्याचा वेगही कमी झाला आहे, त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. मागील २० वर्षातील गोवा आणि आताचा गोव्यात मोठ्या प्रमाणात फरक आहेत. पणजीसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात झाडे होती, परंतु आता क्रॉंक्रीटचे जंगल उभे राहिले आहे. या सगळ्याच्या परिणामातून आता मोठ्या प्रमाणात उष्मा वाढत आहे.
डॉ. रमेशकुमार एम.आर. शास्त्रज्ञ एनआयओ (निवृत्त)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पणजीत पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री खोळंबले

Goa Waste Management: व्यवस्थापनाचा 'कचरा'! राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

Vijay Sardessai: सरदेसाईंनी केली जुन्या फातोर्डा बाजाराची पाहणी; सोबतच सरकारवर सोडले टीकास्त्र

'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Banking Fraud: खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक; 1 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT