National Award  Dainik Gomantak
गोवा

National Award : पावसकर, हाजिक यांना राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्रदान

National Award : पावसकर आणि हाजिक यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट उपक्रम यशस्वी ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

National Award : पणजी, गोवा राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांना यंदाच्‍या दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आज रविवारी हा पुरस्‍कार वितरण सोहळा पार पडला.

गोव्याच्या इतिहासात हा एक मैलाचा दगड ठरला आहे. पावसकर हे दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ अंतर्गत ‘आपल्या राज्यात यशस्वी अंमलबजावणी’ या विभागात सर्वोत्कृष्ट राज्य आयुक्त ठरले तर हाजिक यांना ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन’ विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांमुळे दिव्यांगजनांसाठी त्यांनी केलेले कार्य अधोरेखित झाले आहे.

पावसकर आणि हाजिक यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट उपक्रम यशस्वी ठरला. या सर्वसमावेशक कार्यक्रमाद्वारे दिव्यांगांच्या विविध समूहांना आपल्या क्षमता आणि कलागुण प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT