CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: राज्याला टी. बी. कुन्हांसारख्या देशभक्ताची गरज, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री सावंत: आझाद मैदानात पुण्यतिथी कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: राज्याला टी. बी. कुन्हा यांच्यासारख्या प्रखर देशभक्तांच्या विचारांची गरज आहे. गोवा मुक्तीसाठी ज्यांनी ज्यांनी प्राण वेचले, कष्ट उपसले त्यांची जाणीव सरकारला निश्चितपणे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे आझाद मैदानावर नमूद केले. मैदानावरील कुन्हा यांच्या स्मारकावर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पचक्र वाहिल्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्याचे मुख्यसचिव पुनीतकुमार गोयल. पोलिस महासंचालक जसपालसिंग आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण होत आले आहे. त्याचे सरकार लवकरच लोकार्पण करणार आहे.

स्वातंत्र्यसेनानींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वास्तू, स्थळे संरक्षित करण्यावर सरकारचा भर आहे. गोव्याचा खरा इतिहास राज्याला भेट देणाऱ्यांच्या आणि राज्याच्या भावी पिढीसमोर यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

गोवा मुक्तीसाठी प्रयत्न केलेल्यांच्याप्रती सरकारच्या मनात आदराची भावना आहे. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आज मुक्तीची फळे आम्हाला चाखायला मिळतात याची जाण आहे.

प्रथमच सुरक्षा व्यवस्था

दरवर्षी या मैदानावर हा सोहळा होतो, मात्र जी २० परिषदेनंतर सुरक्षा विषयाकडे बघण्याची बदललेली नजर यावेळी जाणवली. मुख्‍यमंत्री येण्याआधी मैदानाची सारी दारे पोलिसांनी बंद केली होती. एरव्ही मुक्तपणे मैदानावर कार्यक्रम सुरू असताना ये-जा सुरू असायची, ती यंदा दिसली नाही. मेटल डिटेक्टर लावण्यात आला होता. आझाद मैदानासमोरील मुख्य रस्ता इतर वाहतुकीसाठी यंदा बंद करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT