गोवा

Bicholim Fire : डिचोलीच्या अग्नितांडवात थेट उडी घेणारा 'तो' तरुण म्हणजे…

दुकानाच्या छतावर भगभगणाऱ्या आगीची तमा न बाळगता इतरांच्या सहयाने आतील सामान बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न तो तरुण करीत होता.

Vinayak Samant

रात्रीची साधारण 10.30 ची वेळ.. आगीचा डोंब.. बाजार परिसरात व्यापारांची नुसती धावपळ… आग लागलेल्या दुकानांमधून सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम चालू होते आणि अशा धावपळीत भीषण आग लागलेल्या त्या दुकानातील जमेल तेवढं सामान वाचविण्याचा प्रयत्न करणार 'तो' तरुण.

त्या गर्दीमधला प्रत्येकजण त्या तरुणाला तेथून बाहेर येण्यास सांगत होता. पण हा पठ्या ऐकतो कसला. कशाचीही तमा न बाळगता जोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान पोहचत नाही तोपर्यंत 'तो' इतरांच्या मदतीने दुकानातील सामान बाहेर काढत होता.

हल्लीच डिचोली बाजारपेठेत रात्री घडलेल्या अग्नीतांडवात बेधडक घुसून मदातकार्य करणारा तो तरुण होता डिचोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पुंडलीक उर्फ कुंदन फळारी. असा लोकप्रतिनिधी सापडणे क्वचितच जो स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या मदतीला धावून जातो असे तेथील व्यापरीवर्ग म्हणत होते.

या आगीमध्ये सापडलेल्या दुकानांमधील समान काढायला नगराध्यक्ष अग्रेसर होतेच पण सोबत इतर व्यापारी आणि तरूणवर्ग देखील त्यांचा मदतीला हजर होता. यावेळी डिचोलिवासीयांचा एकोपा पाहायला मिळाला.

डिचोली शहरातील आतील पेठ येथे मध्यमवर्गीय कुटुंबात कुंदन याचा जन्म झाला. मनमिळावू स्वभाव, सतत हसतमुख चेहरा, नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी अग्रेसर असल्याने त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने ते एक उत्तम खेळाडू आहेत.

फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मधून प्रशिक्षण घेऊन त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नामांकित क्लबकडून विविध फुटबॉल सामने खेळले आहेत. पण दुर्दैवाने खेळताना त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने मनात इच्छा असूनही स्वतःला फुटबॉल पासून अलिप्त ठेवले.

खेळ सुटला पण त्यांची खिलाडुवृत्ती काही सुटली नाही. फुटबॉल मध्ये करियर करण्याची इच्छा अपुरी राहिल्यावर त्यांनी आखाती देशात काही काळ आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथेही काही मनासारखे होईना म्हणून त्यांनी परत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

परदेशातून परतल्यावर काय करावे असा प्रश्न समोर आला तेव्हा त्यांची प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती, जनमानसात असलेला आदर पाहून त्यांचा मित्रपरिवराने नगरपालिका निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. कसल्याच प्रसिद्धीची अपेक्षा नसल्याने सुरवातीला नकार देऊन सुद्धा सर्वांच्या आग्रहाखातीर त्यांनी निवडणूक लढविली आणि जिंकली देखील.

कुटुंबात कुणालाच राजकारणाचा गंध नसताना २०१५ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. मनमिळावू आणि लाघवी स्वभाव असल्याने ते लगेच सर्वांना आपलेसे वाटू लागले. निस्वार्थीपणे त्यांनी ५ वर्षे लोकांची सेवा केली.

२०२० मध्ये जनतेने परत एकदा कुंदन फळारी यांना पसंती देत सर्वाधिक मताधिक्याने विजयी केले आणि नगराध्यक्ष पदावर नेऊन बसविले. डिचोली नगरपालिकेच्या इतिहासातले सर्वाधिक तरुण नगराध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला ही त्यांचा निस्वार्थी समाजसेवेची पोचपावती म्हणायला हरकत नाही.

मुळातच समाजसेवा आणि मदतीचा हात देण्याचा पिंड घेऊन आलेल्या या नेत्याला कधीच आपल्या हुदयाचा अभिमान आणि गर्वही नाही. सदैव जनतेमध्ये राहून कसलेही काम करण्यात धन्यता मानणारा हा साधारण तरुण, एखाद्या पालिकेचा नगराध्यक्ष असेल यावर अनोळखी माणसाचा विश्वास बसणे कठीणच.

अंगी असलेल्या साधेपणा आणि नम्रपणामुळे त्यांनी आपल्या निस्वार्थ कार्याची झलक पुनः एकदा दाखवून दिली आहे. आपल्या आधी जनतेचा विचार करतो तोच खरा राजा ह्या उक्तीसाठी कुंदन फळारी एक उत्तम उदाहरण ठरू शकतात असे डिचोलीतील नागरिक म्हणतात.

बाजारपेठेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत आणि आगीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक दुकानातील समान सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याची खात्री केल्यानंतरच नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी आपल्या घराची वाट धरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT