Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: अखेर आदेश जारी! शैक्षणिक वर्ष 7 एप्रिलपासूनच; शाळांचे वेळापत्रक, सुट्ट्या याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

New Academic Year Goa: शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्यास पालकांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातही धाव घेतली होती.

Sameer Panditrao

New Education Policy Academic Year 7 April

पणजी: राज्‍य सरकारने सहावी ते दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय आज सकाळी १० वाजता झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सायंकाळी शैक्षणिक वर्ष व सुट्ट्या यांची माहिती देणारा आदेश जारी केला.

शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्यास पालकांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातही धाव घेतली होती. त्यावेळी सरकारने पालकांना आक्षेप नोंदवण्यासाठी १५ दिवस दिल्याचे न्यायालयात म्हटले होते. राज्यभरातील पालकांनी सुमारे १० हजार आक्षेप काल हे आक्षेप सादर करण्यासाठी असलेल्या १५ दिवसांच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सादर केले होते.

आक्षेप सादर करण्याची मुदत संपल्याच्या १२ तासांच्या आतच शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालिका मेघना शेटगावकर, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञ सदस्यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्षाविषयी निर्णय घेतला. त्यानंतर नियमांत दुरुस्ती करण्याचा मसुदा अधिसूचना कायम करणारी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष ठरवणारा आदेश शिक्षण संचालकांनी जारी केला.

१ली ते ५वीचे वर्ग जूनपासून

उन्हाळ्यामुळे एप्रिलमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंतच वर्ग भरवण्यात येणार आहेत. जूनपासून नियमित वेळेत शाळा भरेल असे शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. १ ली ते ५ वीचे वर्ष जूनपासूनच भरवले जाणार आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षारंभी आठवडाभराची सुट्टी

शैक्षणिक वर्ष बदलासाठी राज्य सरकारने गोवा शालेय शिक्षण नियम, १९८६ च्या नियम २१ च्या उप-नियम (२) मधील तरतुदींत बदल केले. शिक्षण खात्याने या मसुद्यावर १५ दिवसांच्या आत आक्षेप आणि सूचना मागविल्या होत्‍या. त्याच्यावर विचार करून ही नियम दुरुस्ती आज कायम करण्यात आली. त्यानुसार १ ली ते ५ वी आणि ११ वीचे शैक्षणिक वर्ष साधारणपणे जूनमध्ये सुरू होऊन एप्रिलमध्ये समाप्त होईल. ६ वी ते १० वी आणि १२ वीचे शैक्षणिक वर्ष साधारणपणे एप्रिलमध्ये सुरू होऊन मार्चमध्ये संपेल.

शैक्षणिक वर्षाच्या समाप्ती व नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीच्या दरम्यान एक आठवड्याचा ब्रेक असेल.

१ मे पासून पाच आठवड्यांची उन्हाळी सुट्टी

शिक्षण संचालक आदेशाद्वारे शैक्षणिक वर्षाचे योग्य प्रमाणात सत्रांमध्ये विभाजन करू शकतात. सर्व वर्गांसाठी १ मे पासून पाच आठवड्यांची उन्हाळी सुट्टी असेल. तसेच दिवाळी सणाशी जुळवून घेण्यासाठी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये (किंवा दोन्ही महिन्यांत) तीन आठवड्यांचा ब्रेक दिला जाईल.

गणपती सणासाठी शिक्षण संचालक जास्तीत जास्त एका आठवड्याची सुट्टी जाहीर करू शकतात, परंतु या ब्रेकमुळे झालेल्या प्रत्यक्ष कामकाजाच्या दिवसांच्या नुकसानीची भरपाई ऐच्छिक सुट्टी कमी करून केली जाईल. दरवर्षी २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत ख्रिसमस सुट्टी असेल अशी नियम दुरुस्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT