Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa LDC Exam Result: शुभवर्तमान! 215 जणांचे सरकारी नोकरीचे स्‍वप्‍न उतरले सत्‍यात! ‘एलडीसी’साठी पात्र ठरलेल्‍यांची अंतिम यादी जाहीर

government job selection goa: ‘एलडीसी’ची २१५ पदे भरण्‍यासाठी घेतलेल्‍या परीक्षांत पात्र ठरलेल्‍या २१५ जणांच्‍या नावांची यादी आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केली.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍य कर्मचारी भरती आयोगामार्फत विविध सरकारी खात्‍यांत ‘एलडीसी’ची २१५ पदे भरण्‍यासाठी घेतलेल्‍या परीक्षांत पात्र ठरलेल्‍या २१५ जणांच्‍या नावांची यादी आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केली. त्‍यामुळे पात्र उमेदवारांचे सरकारी नोकरीचे स्‍वप्‍न लवकरच पूर्ण होणार आहे.

सरकारी खात्‍यांमधील रिक्त ‘एलडीसी’ची पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्‍याची प्रक्रिया सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून सुरू केली होती. त्‍यासाठी सीबीटी २, सीबीटी ३, कौशल्‍य आदी परीक्षा घेण्‍यात आलेल्‍या होत्‍या. या परीक्षांचा निकाल लागून सरकारी खात्‍यांमध्‍ये ‘एलडीसी’ म्‍हणून पात्र ठरलेल्‍या २१५ जणांची यादी आयोगाने जारी केली. कोणत्‍या गटातून कितीजण या पदांसाठी पात्र ठरले, त्‍यांची नावे आणि त्‍यांना मिळालेले अंतिम गुणही आयोगाने जाहीर केले आहेत.

दरम्‍यान, सरकारी खात्‍यांमधील नोकरीची पदे याआधी वशिलेबाजीने भरली जात होती. त्‍याचा फटका संबंधित पदांसाठी पात्र असलेल्‍यांना बसून त्‍यांच्‍यावर अन्‍याय होत होता. त्‍यामुळेच सरकारी खात्‍यांमधील ‘क’ दर्जाची पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्‍याची अंमलबजावणीही सुरू केली. आयोगाने आतापर्यंत अनेक परीक्षा घेतल्‍या असून, त्‍यांचेही निकालही जाहीर केले आहेत. आयोगाची परीक्षा पारदर्शक असल्‍याने सरकारी नोकरीच्‍या (job) प्रतीक्षेत असलेले हजारो युवक-युवती परीक्षांना सामोरे जात असल्‍याचे दिसून येत आहे.

कोणत्‍या गटातील किती पात्र?

खुला: १०२

ओबीसी : ५१

एसटी : २६

आर्थिक मागास : २२

दिव्‍यांग : ८

माजी स्‍वातंत्र्यसैनिक: ३

एससी : २

क्रीडापटू : १

एकूण : २१५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT