Job Dainik Gomantak
गोवा

403 पदांसाठी 10 मे रोजी परीक्षा होणार, कर्मचारी भरती आयोगाकडून माहिती जारी; परीक्षा केंद्रात बदल नाही

Goa Govt Job Exam: मराठी, कोकणी शिक्षकांसह रेंज फॉरेस्‍ट अधिकारी अशा ४०३ पदांसाठी येत्‍या १० मे रोजी सीबीटी २ आणि ३ परीक्षा आयोजित करण्‍याचा निर्णय राज्‍य कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मराठी, कोकणी शिक्षकांसह रेंज फॉरेस्‍ट अधिकारी अशा ४०३ पदांसाठी येत्‍या १० मे रोजी सीबीटी २ आणि ३ परीक्षा आयोजित करण्‍याचा निर्णय राज्‍य कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. त्‍यासंदर्भातील नोटीसही सोमवारी जारी करण्‍यात आली आहे.

कर्मचारी भरती आयोगाने मराठी शिक्षकांची ३५२, कोकणी शिक्षकांची ३८, तर रेंज फॉरेस्‍ट अधिकाऱ्यांची १३ अशी मिळून ४०३ पदे भरण्‍याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला होता. या पदांसाठी येत्‍या १० मे रोजी सीबीटी १ आणि २ या परीक्षा घेण्‍यात येणार असल्‍याचे आयोगाने म्‍हटले आहे.

उमेदवारांना १ मे रोजी ई-प्रवेशपत्र देण्‍यात येईल. तसेच परीक्षा केंद्रांबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्‍यात येईल. उमेदवाराने परीक्षा केंद्र किंवा परीक्षेची वेळ बदलण्याबाबत केलेली कोणतीही विनंती आयोग स्वीकारणार नाही, असेही नोटिशीत म्‍हटले आहे.

३० उमेदवारांचे अर्ज रद्द!

माहिती साहाय्यक या पदांसाठी अर्ज केलेल्या ३० उमेदवारांचे अर्ज त्‍यांच्‍या विनंतीनुसार रद्द करण्‍यात आले असून, त्यांना परीक्षा शुल्क रक्कमही परत करण्यात आली आहेत, अशी नोटीसही कर्मचारी भरती आयोगाने सोमवारी जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Smart City: स्मार्ट सिटीच्या बसथांब्यांवर प्रश्नचिन्ह, रचना बदलाच्या वादात काम अर्धवट; पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय

NEET Exam: गोव्यात 12 केंद्रांवर 'नीट'साठी कडक देखरेख; सर्व यंत्रणा सज्ज, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

Kadamba Bus: कदंब वाहतुकीला नवे बळ; सर्व बस सुस्थितीत, 15 दिवसांत नव्या कदंब बसेसचा ताफा गोव्यात; उल्हास तुयेकर यांची माहिती

Goa Weather: राज्यात उष्णतेचा जोर, पावसाची प्रतीक्षा; मान्सून सक्रिय नसल्याने तापमानात सातत्याने वाढ

Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

SCROLL FOR NEXT