Panaji Smart City: स्मार्ट सिटीच्या बसथांब्यांवर प्रश्नचिन्ह, रचना बदलाच्या वादात काम अर्धवट; पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय

Panaji Smart City bus stops: पणजी स्मार्ट सिटी होणार म्हणून अंतर्गत बससेवाही ई-बसेसद्वारे सुरू झाली.
Panaji Smart City
Panaji Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी स्मार्ट सिटी होणार म्हणून अंतर्गत बससेवाही ई-बसेसद्वारे सुरू झाली. त्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) या बसेसवेला अनरुप बस थांबे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बसथांबे उभारलेही परंतु मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आक्षेप घेतल्यानंतर या बसथांब्यांचे ‘काम जैसे थे’ राहिल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिकेच्या अंतर्गत हे बसथांबे येत असल्याने या थांब्यावर जाहिरातबाजी जोरदार सुरू आहे. या जाहिरातबाजीतून महानगरपालिकेला उत्पन्न मिळत आहे, पण बसथांब्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने ते शहराचा बकलापणा दर्शवित आहेत, असे वाटते.

Panaji Smart City
Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

स्मार्ट सिटीमध्ये पणजीचा समावेश झाला खरा पण ज्या उद्देशाने या शहराचा या उपक्रमामध्ये समावेश झाला तो उद्देशच बाजूला पडला आहे. शहरात अंतर्गत कदंबची ई बससेवा सुरू झाली. त्यासाठी आयपीएससीडीएलने इलेक्ट्रॉनिक आणि वाहकविरहीत बसेस उपलब्धही करून दिल्या.

Panaji Smart City
Goa Weather: राज्यात उष्णतेचा जोर, पावसाची प्रतीक्षा; मान्सून सक्रिय नसल्याने तापमानात सातत्याने वाढ

या सेवेकरिता बसथांबेही आधुनिकरित्या उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी पुण्याची कंपनीही निश्चित झाली, पण जे थांबे उभारले होते, त्याला मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ‘गुराचा गोटा’ असे संबोधत त्याची निर्भत्सना केली होती.

मोन्सेरात यांच्या आक्षेपामुळे संबंधित कंत्राटदाराने थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या बसथांब्याची रचना काही बदलली गेली नाही की ते स्मार्ट सिटीला अनुरूप बनले. ज्या स्थितीत सध्या हे बसथांबे आहेत, त्याचा पावसात प्रवाशांना त्याठिकाणी उभारूनही काही फायदा होणारा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com