एका बाजूला निळाशार अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार वनराई अशी सुंदर रचना असलेले हे गांव. ग्रामदेवी श्री मोरजाई वरुन या गावाला ‘मोरजी’ असे नाव पडले असे गावकरी सांगतात. इथले वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याच गावकऱ्यांची घरे गावातील प्रमुख देवस्थान श्री देव सत्पुरुष मंदिराच्या शिखरापेक्षा उंच नाहीत.
प्रत्येक गावकरी इथल्या जागृत देवी देवतांवर अपार श्रद्धा व भक्ती ठेवून गुण्यागोविंदाने नांदतात. अशा निसर्गरम्य आणि भक्तीभावाने भरलेल्या गावात विनीता रहाते. साधारण कुटुंबात जन्मलेली विनीता तिन्ही भावंडामध्ये सर्वात मोठी. दिसायला जेवढी सुंदर तेवढीच बुद्धीने हुशार.
असे म्हणतात की विधीलिखित काही वेगळेच असते. ‘पहिली बेटी धनाची पेटी’ या आनंदात तिचे कुटुंबीय असतानाच जन्मतः विनीताला मुकबधिरपणा असल्याचे तिच्या पालकांना समजले. आता पुढे हीच कसं होणार ही चिंता त्यांना सतावू लागली.
एकीकडे मुकबधिरपणा असला तरीही ईश्वराने विनीताला बुद्धिमत्तेचे वरदान दिले आहे. दिसायला देखणी असलेली विनीता अभ्यासातही तेवढीच हुशार आहे. विशेष मुलांसाठी असलेल्या संजय उच्च माध्यमिक विध्यायलायातून तिने बारावीत ७६% गुण मिळविले आहे.
यापुढे गोव्यात विशेष मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय नाही. तरीही अजून पुढे शिकण्याची जिद्ध असलेल्या विनीताने शिवोली येथील कीर्ती विध्यालय टेक्निकल इंस्टीट्यूट मधून एक वर्षाचा कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट चा कोर्स पुर्ण केला. टेली आणि कम्प्युटर टायपींग मध्ये देखील ती पारंगत आहे.
विनीताला नृत्याची आणि चित्रकलेची खूप आवड आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला ही आवडतं. पण वडील गेल्यावर मुलांची सगळी जबाबदारी आईवर आली आहे. आजहि उदरनिर्वाहासाठी ऑम्लेट ची गाडी टाकून भावंडांच्या शिक्षणाचा खर्च व घरखर्च भागविला जातो.
याच दरम्यान विनीताला जानेवारी महिन्यात गोव्यात होणाऱ्या 'पर्पल फेस्ट' आणि त्यात असणाऱ्या ‘मिस डेफ इंडिया’ या प्रतियोगीतेबद्दल समजले आणि विनीताला एक नवी दिशा मिळाली. तिने लगेच आपले नाव या स्पर्धेमध्ये नोंदविले. पण खरे आव्हान होते ते स्पर्धेच्या तयारीचे.
यावेळी तिच्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने तिला पुर्ण पाठिंबा दिला. तिला हवी असणारी सर्वप्रकरची मदत करायला सर्वजण पुढे आले. आपल्या प्रचंड इच्छाशक्ती, अपार जिद्द, अथक मेहनत आणि प्रबळ आत्मविश्वासच्या जोरावर तिने ‘मिस डेफ इंडिया २०२३’ हा किताब पटकाविला.
त्यानंतर तिचे आयुष्य क्षणाधार्थ बदलून गेले. कालपर्यंत सर्वसाधारण असलेली विनीता ‘मिस डेफ इंडिया’ बनणारी पहिली गोमंतकीय ठरली. तिच्यासाठी हे सर्व स्वप्नवत होते. एक साधारण कुटुंबात जन्म घेऊन आणी स्वत: मधील असलेल्या कमतरतेवर मात करत तिने स्वतःला सिद्ध आहे.
मोरजी गावात राहणारी ही २२ वर्षीय विनीता शिरोडकर आता आफ्रिकेतील टांझानिया येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड डेफ स्पर्धे’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. १९ नोव्हेंबेर ते २९ नोव्हेंबेर असा या स्पर्धेचा कालावधी आहे.
‘मिस डेफ इंडिया’ किताब पटकावणारी पहिली गोमंतकीय झाल्याचा खूप आनंद आहे आणि स्पर्धा जिंकल्याने माझ्यामधला आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. त्याचबरोबर आपल्या खांद्यावरची जाबाबदारी वाढल्याची जाणीव देखील आहे. मला भविष्यात माझ्यासारख्या मुकबधिर बंधावांसाठी आणि मुख्यतो मुकबधिर महिलांचे सशक्तीकरण करण्यावर भर द्यायचा आहेविनीता शिरोडकर, मिस डेफ इंडिया २०२३
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.