Vishwajit Rane: आरोलकर हे सामान्य आमदार; त्यांनी आधी घरी येऊन मागणी केली होती अन् आता विरोध करताहेत...

नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणेंचे आरोप; मी तेव्हाच आरोलकांना सांगितले होते की मी दलाल नाही...
Vishwajit Rane On MLA Jit Arolkar
Vishwajit Rane On MLA Jit Arolkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Vishwajit Rane: पेडण्यातील जमिनीच्या रूपांतरणाचा प्रश्न गोव्यात आता पेटू लागला आहे. नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रश्नावरून आता आमदार जीत आरोलकर यांच्यावर टीका केली आहे.

आमदार आरोलकर यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यांनीच आधी माझ्याकडे 1 लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्याची मागणी केली होती. आणि आता तेच हा झोनिंग प्लॅन स्क्रॅप करा, असे म्हणताहेत, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane On MLA Jit Arolkar
Goa Accidents: गोव्यात या वर्षात आत्तापर्यंत अपघातात 200 मृत्यू; 2865 ड्रायव्हिंग परवाने निलंबित

गुरूवारी आमदार जीत आरोलकर यांनी जनतेच्या सूचनेनुसार आराखड्यात बदल करावा अशी मागणी करत, तसे न केल्यास रविवारी चोपडे पूल अडवू, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभुमीवर मंत्री राणे यांनी ही टीका केली आहे.

राणे म्हणाले की, पेडण्यातील एक लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करावे, अशी मागणी घेऊन आमदार जीत आरोलकर माझ्या घरी आले होते. तेव्हा मी त्यांना मी करू शकत नाही. मी दलाल किंवा ब्रोकर नाही, असे म्हटले होते.

मी जीत आरोलकरांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत नाही. ते एक सामान्य आमदार आहेत. ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांना काही सांगायचे असेल तर त्यांनी योग्य लोकशाही मार्गाने सांगावे.

Vishwajit Rane On MLA Jit Arolkar
Goa Power Shutdown: बार्देश तालुक्यातील अनेक भागात 9 ऑक्टोबरला वीज पुरवठा राहणार बंद

दरम्यान, या प्लॅनला अंतिम स्वरूप देण्यापुर्वी सर्व सूचनांचा आणि हरकतींचा अभ्यास करू. पंचायतनिहाय प्रेझेंटेशन दिले जाईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

गुरूवारी मंत्री राणे यांनी पेडण्याच्या विभागीय नियोजन आराखड्यात (झोन) दाखवलेले बदल हे केवळ मसुद्याच्या स्वरूपात आहेत. तालुक्‍यातील पंचायतींना डावलून सरकार यासंदर्भात काहीही करणार नाही. पेडणेतील विकासाबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com