ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित, गौरव दिनासाठी 8 कोटींचे अंदाजपत्रक; उटा संघटनेचा खर्चाला विरोध

Goa ST Political Reservation: गोव्यातील एसटी (अनुसूचित जमात) समाज राजकीय आरक्षणासाठी लढा देत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: गोव्यातील एसटी (अनुसूचित जमात) समाज राजकीय आरक्षणासाठी लढा देत आहे. २०१२ साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, तेव्हाही राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आश्वासन दिले होते. आता भाजप सरकार १५ वर्षे सत्तेत आहे; पण एसटीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही.

सरकार हा मुद्दा भिजत ठेवू पाहत आहे. त्यासाठी आम्हाला काही तरी वेगळा निर्धार करावा लागेल, असे उटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी ८ कोटी रुपये! १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून, हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

त्यासाठी आदिवासी कल्याण खात्याने आठ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केल्याची माहिती खात्याकडून मिळाली आहे, असे उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले. वेळीप यांनी सांगितले. एवढा खर्च आम्हाला कदापि मान्य नाही. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी उटा संघटनेला द्या. आम्ही काही लाख रुपयांत तो धुमधडाक्यात साजरा करू, असेही ते म्हणाले.

४.४१ कोटी खर्च!

२०२६ सालच्या प्रेरणा दिन कार्यक्रमासाठी ४.४१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे आदिवासी कल्याण खात्यातर्फे सांगण्यात आले असून, त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. या खर्चाशी उटा संघटनेचा काहीही संबंध नाही, असा खुलासा अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केला. या खर्चाला उटा संघटना कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही किंवा त्यात आमचा काडीचाही सहभाग नाही, असे वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'वाद नको, गोवा रक्षणाचा विचार करा'; तृप्ती बकाल यांचा मनोज परब, अजय खोलकरांना टोला

BJP Election Strategy: गोव्यात भाजपचे 'मिशन चौथ्यांदा सत्ता'! 32 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निवडणुकीत करणार प्रचार

खरी कुजबुज: युतीची चर्चा जोरात; पण काँग्रेसच्या गोटात धुसफूस!

GFA Election: गोमंतकीय फुटबॉलची धुरा प्रथमच महिलेच्या हाती! वालंका आलेमाव यांचा ऐतिहासिक विजय

Girl Hair Stuck in Gearbox: गोव्यात फेरीबोटीत थरार! हायड्रोलिक गिअर बॉक्समध्ये अडकले दहावीच्या विद्यार्थिनीचे केस

SCROLL FOR NEXT