Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa News: हक्काचे पैसे मागितले, पोलिसांनी ताब्यात घेतले

दैनिक गोमन्तक

Goa News:

पणजी येथे गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वेच्छेने स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे गोवा क्रीडा प्राधिकरणाने अद्याप पैसे अदा केलेले नाहीत. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसशी निगडित असलेल्या नॅशनल स्टुडंट्स ऑफ युनियन (एनएसयूआय) या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांसह सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आगशी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ‘सेल्फ बॉंड’ लिहून घेतल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी समाज माध्यमांद्वारे भाजप सरकारवर टीका केली आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास बांबोळी येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात एनएसयूआयचे सदस्य दाखल झाले. एनएसयूआयचे विद्यार्थी येणार म्हटल्यानंतर आगशी पोलिस स्थानकातील पोलिस त्या ठिकाणी अगोदरच पोहोचले होते. प्राधिकरणाच्या कार्यालयात संचालक असतानाही त्यांनी या सदस्यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही. त्यामुळे कार्यालयाच्या ठिकाणी ठिय्या मांडला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांचा त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. तत्पूर्वी गोव्याचा शहाजान (मंत्री गावडे यांचे नाव न घेता) कला अकादमी व राष्ट्रीय खेळांमध्ये भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो, अशी उपरोधिक टीका करीत ठिय्या मांडलेले नौशाद म्हणाले, अलीकडेच सरकारी खात्यातील एका संचालकाला त्यांनी धमकावले, पण भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांनी यशस्वी करण्यास मदत केली, परंतु त्यांना त्यांच्या कामाचे पैसे अद्याप दिले गेले नाहीत. ‘शहाजान घोटाळा’ने राष्ट्रीय खेळांसाठी स्वेच्छेने सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांचे पैसेही लुटल्याचा आरोप त्यांनी केला.

अखेर आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पहिल्या मजल्यावरील संचालकांच्या कक्षाकडे धाव घेतली. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले. काहीजणांना पोलिसांनी पहिल्या मजल्यावरून उचलून खाली आणले.

‘ही लोकशाही आहे का?’

आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप नोंदविला. राज्य सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिस बळाचा दुरुपयोग करीत आहे. ही लोकशाही आहे का? जिथे विद्यार्थ्यांना न्याय मागताना ताब्यात घेतले जाते, असा सवाल एका विद्यार्थिनीने केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT