WTT Star Contender Goa 2024: डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर 2024 टेबल टेनिस स्पर्धेतील मोहिमेला भारतीय खेळाडू मानव ठक्कर व अहिका मुखर्जी यांनी विजयाने सुरवात केली, मात्र अनुभवी अचंता शरथ कमल याच्यासह सनील शेट्टी याला पराभवाचा धक्का बसला.
स्पर्धेला मंगळवारपासून पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरवात झाली. पुरुष एकेरीत मानव ठक्कर याने अंशुमन अगरवाल याचा ३-० (११-७, ११-४, ११-४) असा पराभव केला.
महिला एकेरी गटात अहिका मुखर्जीने सायली वाणी हिच्यावर ३-० ( ११-९, ११-२, १२-१०) अशा फरकाने मात केली. आणखी एक लढतीत पोयमंती बैस्याने पहिल्या फेरीत प्रिथा प्रिया वर्टिकर हिला ३-० ( १२-१०, ११-७, ११-७) असे नमविले.
पुरुष एकेरीतील पात्रता फेरीत अचंता शरथ कमल याला दक्षिण कोरियाच्या कांग डोंगसू याने ३-२ (६-११, १०-१२, ११-४, १७-१५, ११-३) असे कडव्या झुंजीनंतर नमविले. सनील शेट्टी यालाही अल्जेरियाच्या मेहदी बौलौस्सा याच्याकडून ३-२ (१४-१२, ११-९, ११-१३, ७-११, ११-६) अशी निसटती हार पत्करावी लागली.
मानुष-दिया जोडीचा विजय
मिश्र दुहेरी गटात मानुष शाह आणि दिया चितळे या भारतीय जोडीने सिंगापूरच्या क्वेक इझाक आणि झोऊ जिंगयी जोडीचा ३-० (११-४, ११-७, ११-६) असा, तर श्रीजा अकुला आणि स्नेहित सुरवाज्जुला जोडीनेही सिंगापूरच्या पॅंग कोएन व वाँग रू या इंडोनेशियन जोडीचा ३-१ (११-९, १३-११, ७-११, ११-८) असे नमविले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.