table tennis Dainik Gomantak
गोवा

Table Tennis Association: नवी कार्यकारिणी जाहीर! व्यावसायिक पातळीवर ज्युनियर लीग सुरू करणार- अध्यक्षांची ग्वाही

Goa Table Tennis Association: सुदिन वेरेकर संघटनेच्या अध्यक्षपदी ः ग्रामीण भागात खेळाच्या विकासाचे नियोजन

किशोर पेटकर

Goa Table Tennis Association: गोवा टेबल टेनिस संघटनेची 2024-2028 या कालावधीसाठी कार्यकारिणी बिनविरोध ठरली. संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अध्यक्ष सुदिन वेरेकर यांनी राज्यस्तरीय टेबल टेनिस उत्कृष्टता केंद्राचे उद्दिष्ट बाळगल्याचे सांगितले.

तसेच काणकोण, वाळपईसह ग्रामीण भागात खेळाच्या विकासाचे नियोजन असल्याचे नमूद केले. गोवा टेबल टेनिस संघटनेच्या आमसभा-निवडणुकीसाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव, आठ वेळचे माजी राष्ट्रीय विजेते कमलेश मेहता उपस्थित होते.

ते यावेळी महासंघाचे निरीक्षक होते. याशिवाय गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे जयेश नाईक निरीक्षक होते. ॲड. महेश रायकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

मावळते अध्यक्ष व्हेरो नुनीस यांनी राज्य टेबल टेनिसमध्ये दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांची संघटनेचे तहहयात अध्यक्ष व सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सुदिन वेरेकर यांनी सांगितले, की ‘‘तीन वर्षांच्या कालावधीत कांपाल येथे दर्जेदार असे टेबल टेनिससाठी राज्य उत्कृष्टता केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न असतील.

काणकोण, वाळपई, तसेच इतर ग्रामीण भागात टेबल टेनिसचा विकास साधताना शालेय पातळीवर प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. तालुकास्तरीय स्पर्धांचे नियोजन असून यूटीटी इंडिया लीगच्या धर्तीवर व्यावसायिक पातळीवर ज्युनियर लीग सुरू केली जाईल.

यामुळे बाहेरगावच्या उच्च दर्जाच्या खेळाडूंशी खेळण्यासाठी गोव्यातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होईल.’’

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी टेबल टेनिसच्या विविध उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिलेले आहे, भविष्यात राज्यातील टेबल टेनिसला अत्त्युच्च पातळीवर नेण्यासाठी त्यांचे सदोदित सहकार्य लाभेल, असा विश्वासही वेरेकर यांनी व्यक्त केला.

स्थानिक प्रशिक्षकांना प्राधान्य द्या: कमलेश

गोव्यातील टेबल टेनिसपटूंच्या विकासात स्थानिक प्रशिक्षकांना प्राधान्य देण्याचा सल्ला कमलेश मेहता यांनी दिला.

महासंघाच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्याची क्षमता गोव्यापाशी असल्याचा विश्वास व्यक्त करून या दिग्गज टेबल टेनिसपटूने पर्यटनाबरोबर क्रीडा केंद्र म्हणून प्रगती साधत असल्याबद्दल राज्याची प्रशंसा केली.

गोवा टेबल टेनिस संघटनेची नवी कार्यकारिणी

अध्यक्ष ः सुदिन वेरेकर, सचिव ः ख्रिस्तोफर मिनेझिस, खजिनदार ः ऐश्वर्या नुनीस, उपाध्यक्ष ः नोएल नोरोन्हा, मयूर सावकार, विक्रम वेर्लेकर, एडविन मिनेझिस, सह सचिव ः नीलेश कीर्तनी, सदस्य ः कबीर पिंटो मखिजा, दामोदर भाटकार, आल्वितो डिसिल्वा, संतोष वेरेकर, स्वीकृत सदस्य ः नारायण (अजित) घाटकर, विष्णू कोलवाळकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT