Women's ODI Cricket: तरन्नूम, श्रेया दक्षिण विभाग संघात

Women's ODI Cricket: गोव्याच्या दोघींची शानदार कामगिरी
Women's ODI Cricket Tournament
Women's ODI Cricket TournamentTwitter/BCCI
Published on
Updated on

Women's ODI Cricket: सीनियर महिलांच्या आगामी आंतरविभागीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघात गोव्याच्या दोघींची निवड झाली आहे. अष्टपैलू तरन्नूम पठाण आणि सलामीची बॅटर श्रेया परब यांना संघात स्थान मिळाले.

आंतरविभागीय स्पर्धा 30 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत बडोडा येथे खेळली जाईल. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई दक्षिण विभागाचे निमंत्रक आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाच्या निवड समितीची बैठक पर्वरी येथे झाली. त्यावेळी हल्लीच झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे तरन्नूम व श्रेया यांची निवड झाली.

Women's ODI Cricket Tournament
पणजीतील MG रोड बंद होणार, वाहतूक '18 जून'ने वळवणार; MD नी सांगितली Smart City च्या कामांची स्थिती

एकदिवसीय स्पर्धेत चमक

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत श्रेया हिने सहा सामन्यांत एक वेळ नाबाद राहत ५७.२ च्या सरासरीने २८६ धावा केल्या. मेघालयाविरुद्ध तिने १३८ चेंडूंत १७ चौकार व एका षटकारांसह १३९ धावांची झंझावातील खेळी केली.

तरन्नूम हिने फलंदाजीत सहा सामन्यांतील पाच डावांत तीन वेळा नाबाद राहत ६७.५ च्या सरासरीने १३५ धावा नोंदविल्या. राजस्थानविरुद्ध तिने नाबाद अर्धशतक (५२) नोंदविले. फिरकी गोलंदाजीने तिने सहा सामन्यांतील सहा डावात १८.८७ च्या सरासरीने आठ विकेट टिपल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Virat Kohli Ruled Out From Three Match Odi Series Against Afghanistan
Goa Child Rights Commission Funds Blocked
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Dipendra Singh Airee ODI Century
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com