Shreeja Akul Dainik Gomantak
गोवा

Star Contender Table Tennis: श्रीजा अकुलाची आगेकूच; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Star Contender Table Tennis: मनिका, अर्चना यांचे पराभव

किशोर पेटकर

Star Contender Table Tennis 2024: डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर २०२४ टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुला हिने आगेकूच राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मनिका बत्रा व अर्चना कामत यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरू आहे.

जागतिक मानांकनात ३६व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या डू होई केम हिच्यावर श्रीजा हिने ३-१ (१२-१०, ८-११, ११-८, ११-८) असा विजय नोंदविला.

हैदराबादची श्रीजा जागतिक क्रमवारीत ६६वी आहे. ‘‘हा विजय निश्चितच आनंद देणारा आहे. याच प्रतिस्पर्धी खेळाडूकडून मला २०२१ साली पराभूत व्हावे लागले होते, त्यामुळे आता तिला नमविल्यामुळे खूप छान वाटत आहे.

योजनांची मी अचूक अंमलबजावणी केली. सामन्यात स्वतःला प्रेरित केले. चेंडूवर सारे लक्ष केंद्रित केले,’’ असे श्रीजा हिने सामन्यानंतर सांगितले.

जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानी असलेल्या मनिका बत्रा हिला मोनॅकोच्या शिओशिन यँग हिच्याकडून १-३ (११-९, ११-१३, ७-११, ९-११) अषी हार पत्करावी लागली.

यँग जागतिक क्रमवारीत १३वी आहे. अर्चना कामत हिला दक्षिण कोरियाच्या जेओन जिही हिच्याकडून १-३ (११-१३, ११-९, ६-११, ४-११) असा पराभव पत्करावा लागला.

महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत आठवी असलेली दक्षिण कोरियाची शिन युबिन, तैवानची १८व्या क्रमांकावरील चेंग आय-चिंग यांनीही पुढील फेरी गाठली.

पुरुष एकेरीत जागतिक मानाकांतील १६व्या क्रमांकावरील फ्रान्सचा फेलिक्स लेब्रून विजयी झाला, मात्र त्याचा भाऊ अलेक्सिस लेब्रून याला जागतिक क्रमवारीतील 14 व्या स्थानी असलेल्या नायजेरियाच्या कादरी अरुना याच्याकडून पराभव पत्कारावा लागला. सहावेळचा ऑलिंपिक पदक विजेता जर्मनीचा दिमित्री ओव्हखारोव्ह यानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT