गोमंतकिय सुशेगादपण अनुभवत रुढी- परंपरा जपणारी उत्तर गोव्यातील संतभूमी: पालये

Paliyem village in Goa: आजच्यासारखी वाहतूक आणि दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा पालये गाव स्वयंपूर्ण होता.
Paliyem village
Paliyem villageDainik Gomantak
Published on
Updated on

Paliyem village in Goa: उत्तर गोव्यातील पेडणे, कोरगाव हे गाव निसर्गसंपन्न असून शहरी कोलाहलातून निवांतपणा (ज्याला अस्सल गोवेकर सुशेगाद म्हणून संबोधतो) अनुभवायचा असेल तर या गावांना आवर्जून भेट दिलीच पाहिजे. या निसर्गसंपन्न गावांच्या मांदियाळीतील पालये हे गावं असेच गोमंतकियांचे सुशेगादपण जपणारे. 'गोवा समजून घेताना' सिरीजमधून या गावाबद्दल माहिती देण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...

अथांग, निळ्याशार अरबी सागराच्या किनारी वसलेला आणि केरी, हरमल आणि कोरगाव या पेडणेतील तीन गावांच्या सानिध्यात असलेला निसर्गसुंदर पालये हा गाव शेकडो वर्षांपासून शांत आणि नीटनेटके वास्तव्य करून राहिला आहे.

इथल्या सुपीक जमिनीच्या आणि जलस्रोतांच्या आधारे गावकऱ्यांनी आपले जीवन समृद्ध केले आहे. पेडणेतील सत्तावीस महसुली गावांपैकी अंदाजे 999 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाला एका बाजूने तेरेखोल नदीच्या खाडीने तर दुसऱ्या बाजूने अरबी सागराने वेढलेले आहे.

समाजजीवन आणि उपजीविकेची साधनं:-

समुद्राचे खारे पाणी तेरेखोल नदीत घुसत असल्याने पालये परिसरात खारफुटीचे वैभव अनुभवता येते आणि त्यामुळे येथे नाना त-हेचे मासे, कोळंबी, खेकडे, खुबे यांची पैदास होत असलेली पहायला मिळते.

शेती, मासेमारी, भाजीमळे ही इथल्या कष्टकरी समाजाला उपजीविकेची साधने परंपरेने प्राप्त झाली होती. आजच्यासारखी वाहतूक आणि दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा पालये गाव स्वयंपूर्ण होता.

इथल्या मातीने शेतमळ्यांना सुपीकता प्रदान केली आहे. त्यासाठी इथल्या कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा मृण्मयी वारुळाच्या रुपात तर दर्याच्या सम्राटाला आग्यो आणि गेरखो बेताळाच्या रुपात पूजलेले आहे.

Paliyem village
Goa Congress: लोकसभा निवडणूक तयारीचा पक्ष निरीक्षकांकडून आढावा; दक्षिण गोव्यात स्क्रीनिंग कमिटीची बैठक

गावातील रुढी- परंपरा:-

पालयेच्या ग्रामसंस्थेने भूमका, वेताळ, रवळनाथ, भगवती, महालक्ष्मी, महादेव, ब्राह्मण आणि वाटेराम पुरुष या लोकदैवतांचे आशीर्वचन धारण करून इथले लोकजीवन विकसित केले होते.

ढोल-ताशांच्या गजरात दसऱ्याला रंगणारा तरंगोत्सव असो अथवा लोकगीतांच्या पार्श्वभूमीवर होणारा मर्दानी बाण्याचा रोमटा मेळातील आविष्कार, इथल्या कष्टकरी समाजाची नाळ या मातीत पुरलेली आहे याचा साक्षात्कार घडवतो.

आज पालयेत बहुसंख्य हिंदुबरोबर खिस्ती समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. बाबाखानवाडा हे नाव आणि मधलावाडा येथे असणारे पिराचे धडगे एकेकाळी इथे असलेल्या मुस्लिम वस्तीची आठवण करून देतात.

Paliyem village
MGP ONOP: 'मगो' वन नेशन वन इलेक्शनच्या समर्थनात, पक्षाध्यक्षांनी घेतली माजी राष्ट्रपतींची भेट

संतांची भूमी:-

अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे अशा अभंगाद्वारे लोकजागृतीचा प्रसार करणाऱ्या संत सोहिरोबानाथ आंबिये यांचा1714 साली पालयेत जन्म झाला.

अभंग, पदे, श्लोक त्याचप्रमाणे सिद्धांत संहिता, अक्षयबोध, पूर्णाक्षरीसारखी ग्रंथनिर्मिती करणाऱ्या या संत पुरुषाच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा गाव आजही तितकाच दिव्यत्वाची प्रचिती देणारा आहे. मराठी नाट्य परंपरा, भजन- किर्तनाचा वारसा मिरवणारा पालये गाव जरुर पहावाच..

गावाला भेट देण्यासाठी कसे जाल?

पेडणेतून येताना भालखाजन, मांद्रेतून येताना हरमलमार्गे तर महाराष्ट्र आरोंदा किरणपाणीतून येताना जलमार्गे पालयेत येणे शक्य होते.

तर राजधानी पणजीमधून जर तुम्ही पालये गावाला भेट देणार असाल तर पणजी- पालये हे अंतर जवळपास 45-46 कमी असून पणजीतून म्हापसा (पणजी- म्हापसा 15 km नंतर असून बसेसची सोय आहे.) येथे यावे लागेल.

म्हापसा बस स्टँडहून या गावाला जाण्यासाठी खासगी आणि कदंब बसेसची सुविधा उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com