Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवा पुन्हा ‘शिल्ड’च्या शर्यतीत

Indian Super League: सदोईच्या गोलमुळे ईस्ट बंगालवर 1-0 अशी मात

किशोर पेटकर

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील ‘शिल्ड’च्या शर्यतीत कायम राहताना एफसी गोवाने बुधवारी रात्री महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. पूर्वार्धातील नोआ सदोई याच्या गोलमुळे त्यांनी ईस्ट बंगालला 1-0 असे हरविले.

फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मागील दोन लढती गमावलेला यजमान संघ या निकालासह घरच्या मैदानावर पुन्हा विजयपथावर आला.

नोआ सदोई याने 42व्या मिनिटास केलेला गोल मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी निर्णायक ठरला. इतर काही संधी साधल्या असत्या, तर एफसी गोवास मोठ्या फरकाने जिंकता आले असते.

त्यांचा हा 17 सामन्यातील नववा विजय ठरला. त्यांचे आता 32 गुण झाले असून चौथा क्रमांक राखला आहे. ओडिशा एफसी व मुंबई सिटी (प्रत्येकी ३५ गुण) यांच्या तुलनेत तीन गुण, तर मोहन बागानपेक्षा (३३ गुण) एक गुण कमी आहे.

केरळा ब्लास्टर्सला (२९ गुण) एफसी गोवाने तीन गुणांनी मागे टाकले आहे. ईस्ट बंगालला आठवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १८ सामन्यांतून त्यांचे १८ गुण व नववा क्रमांक कायम आहे.

या पराभवामुळे प्ले-ऑफ फेरी गाठण्याची ईस्ट बंगालची शक्यता धूसर बनली आहे. एफसी गोवाचा पुढील सामना अवे मैदानावर पंजाब एफसीविरुद्ध ११ मार्च रोजी होईल.

यजमान संघाचे वर्चस्व

एफसी गोवा संघाने ईस्ट बंगालविरुद्ध सलग चौथ्या, तर मोसमातील लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने कोलकात्यातील संघावर २-१ फरकाने मात केली होती.

बुधवारी महंमद यासीरच्या असिस्टवर नोआ याने अचूक नेम साधताना ईस्ट बंगालचा गोलरक्षक प्रभसुखन सिंग गिल याला पूर्णतः हतबल ठरविले. त्यापूर्वी समोर फक्त गोलरक्षक असताना नोआ अचूक फटका मारू शकला नव्हता आणि त्यामुळे एफसी गोवाच्या आघाडीची प्रतीक्षा वाढली.

गोलरक्षक गिल याने पूर्वार्धात कार्लोस मार्टिनेझ, महंमद यासीर, रॉलिन बोर्जिस यांचे फटके अडवून संघावरील संकट टाळले होते. ८३व्या मिनिटास बदली खेळाडू उदांत सिंग याचा हेडर गोलपोस्टला आपटल्यामुळे एफसी गोवाची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT