Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवा ‘प्ले-ऑफ’पासून एक गुण दूर

Indian Super League : पंजाब एफसीही आगेकूच राखण्यास इच्छुक

किशोर पेटकर

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील ‘शिल्ड’साठी दावा सांगणाऱ्या एफसी गोवा संघाला प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी एका गुणाची आवश्यकता आहे. पंजाब एफसीविरुद्ध त्यांनी अपेक्षित निकाल नोंदविल्यास पुढील फेरी गाठणाऱ्या चौथा संघाचा मान त्यांना मिळेल.

एफसी गोवा व पंजाब एफसी यांच्यातील सामना सोमवारी (ता. ११) नवी दिल्लीत खेळला जाईल. त्यावेळी पंजाबच्या संघाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास त्यांनाही प्ले-ऑफ फेरीची संधी असेल.

या फेरीतील सहाव्या जागेसाठी पंजाब एफसी संघ दावेदार आहे. मुंबई सिटी (३६ गुण), ओडिशा एफसी (३५ गुण), मोहन बागान (३३ गुण) या तीन संघांनी प्ले-ऑफ फेरी निश्चित केली आहे. एफसी गोवाचे सध्या १७ लढतीतून ३२ गुण असून ते चौथ्या क्रमांकावर असून त्यांना पात्रतेसाठी एक गुण हवा आहे.

पंजाब एफसीचे १८ लढतीतून २० गुण आहेत. सहाव्या क्रमांकावरील जमशेदपूर व सातव्या क्रमांकावरील बंगळूर (प्रत्येकी २१ गुण) यांच्यापेक्षा पंजाबचा फक्त एक गुण कमी आहे. आयएसएल साखळी फेरीतील पहिले सहा संघ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील.

प्ले-ऑफसाठी दोन वर्षांची प्रतीक्षा

एफसी गोवा संघाला आयएसएल स्पर्धेच्या मागील दोन स्पर्धांत प्ले-ऑफ फेरी गाठता आली नव्हती. यंदा मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहेत.

२०२१-२२ मध्ये नववा क्रमांक, तर २०२२-२३ मध्ये सातवा क्रमांक मिळाल्यामुळे एफसी गोवा संघ आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठू शकला नव्हता.

स्पर्धेतील पाच लढतीत दोन बरोबरी व तीन पराभव पत्करल्यानंतर एफसी गोवाने फातोर्ड्यात अगोदरच्या लढतीत ईस्ट बंगालला एका गोलने हरवून स्थिती सुधारली.

पंजाबविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रीत

‘‘आम्हाला अजूनही आयएसएल शिल्ड जिंकण्याची संधी आहे. आता आम्ही सोमवारी होणाऱ्या पंजाब एफसीविरुद्धच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. तो सामना जिंकण्याचेच आमचे प्रयत्न असतील.

त्यानंतर पुढील प्रतिस्पर्धी बंगळूर एफसीविरुद्धच्या लढतीचा आम्ही विचार करू. आता बाकी सर्व सामने जिंकण्याचा निर्धार आहे,’’ असे एफसी गोवाचे मार्गदर्शक मार्केझ यांनी सांगितले.

एफसी गोवाच्या पाच खेळाडूंना सध्या स्पर्धेत तीन यलो कार्ड मिळालेली आहेत. आणखी एकदा ताकीद मिळाल्यास आगामी लढतीत निलंबन होऊ शकते, त्यादृष्टीने खेळाडूंनाही मैदानावर सावध राहावे लागेल.

एकमेव लढतीत एफसी गोवा विजयी

पंजाब एफसीने यंदा आयएसएल स्पर्धेत पदार्पण केले आहे. स्टॅईकोस व्हर्गेटिस यांच्या मार्गदर्शनाखालील संघाविरुद्ध एफसी गोवाने एकमेव लढतीत विजय मिळविला आहे.

२ ऑक्टोबर २०२३ रोजी फातोर्ड्यात एफसी गोवाने पंजाब एफसीविरुद्ध कार्लोस मार्टिनेझ याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर पूर्ण तीन गुण प्राप्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT