Beach Soccer Dainik Gomantak
गोवा

National Beach Soccer Championship: राष्ट्रीय बीच सॉकर गोव्यात; अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा निर्णय

National Beach Soccer Championship: गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बीच सॉकर सुवर्णपदकही केरळने जिंकले होते.

किशोर पेटकर

National Beach Soccer Championship:

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आगामी राष्ट्रीय बीच सॉकर स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल केले. महासंघाच्या बीच सॉकर कमिटीची बैठक सोमवारी झाली, त्यावेळी याविषयी निर्णय झाला.

राष्ट्रीय बीच सॉकर स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रस्ताव गोवा फुटबॉल संघटनेने (जीएफए) सादर केला होता, त्याबद्दल कमिटीने जीएफएची प्रशंसा केली.

या खेळाचा विकास व प्रसाराच्या दृष्टीने देशातील किनारपट्टी भागातील राज्यांनी बीच सॉकरला प्रोत्साहन देण्याची सूचना महासंघाच्या बीच सॉकर कमिटीने यावेळी केली.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने विविध राज्यांतील फुटबॉल संघटनांसाठी बीच सॉकरसंदर्भात अंदाजपत्रकात तरतूद करावी, तसेच रेफरी व प्रशिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शक शिबिरे घेण्याचेही सुचविले.

केरळ संघ गतविजेता

गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत गुजरातमधील सूरत येथील दुमास बीचवर पहिली राष्ट्रीय बीच सॉकर स्पर्धा झाली होती. त्यावेळी केरळने अंतिम लढतीत पंजाबला हरवून विजेतेपद पटकावले होते.

तेव्हा स्पर्धेत देशातील 19 राज्य संघांनी भाग घेतला होता. गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बीच सॉकर सुवर्णपदकही केरळने जिंकले होते.

त्यावेळी कोलवा समुद्रकिनारी झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत त्यांनी यजमान गोव्यावर 7-5 अशी मात केली होती. यावर्षी जानेवारीत दीव येथे झालेल्या बीच गेम्समध्ये लक्षद्वीपने विजेतेपद मिळविताना महाराष्ट्रावर मात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT