I-League Football Dainik Gomantak
गोवा

I-League Football: टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियनवर मात करत चर्चिल ब्रदर्स पुन्हा विजयपथावर

I-League Football: दुबळ्या ट्राऊ संघावर चार गोलने मात

किशोर पेटकर

I-League Football माजी विजेता चर्चिल ब्रदर्स संघ यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुन्हा विजयपथावर आला. लागोपाठ दोन सामन्यांत पराभूत झाल्यानंतर बुधवारी त्यांनी दुबळ्या टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) संघावर ४-० असा एकतर्फी विजय नोंदविला. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला.

चर्चिल ब्रदर्स संघ पूर्वार्धात दोन गोलने आघाडीवर होता. अर्जेंटिनाच्या रिकार्डो डिचियारा याने १८व्या, तर रिचर्ड कॉस्ता याने ३३व्या मिनिटास गोल नोंदविला. नंतर ६९व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नायजेरियन ओगाना लुईस संघाची आघाडी वाढविली.

८३व्या मिनिटास अर्जेंटिनाच्या एमिलियानो टोर्रे याने चर्चिल ब्रदर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. राजस्थान युनायटेड व इंटर काशी संघाविरुद्ध पराभूत झालेल्या चर्चिल ब्रदर्स संघाला बुधवारच्या विजयामुळे दिलासा मिळाला.

त्यांचा हा पाच लढतीतील दुसरा विजय असून सात गुणांसह ते आठव्या क्रमांकावर आहेत. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना रविवारी (ता. २६) अवे मैदानावर गोकुळम केरळा संघाविरुद्ध होईल.

मणिपूरच्या ट्राऊ संघाला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा सामने खेळल्यानंतर इंफाळचा संघ एका गुणासह शेवटच्या १३व्या क्रमांकावर कायम राहिला. दिल्ली एफसीला पहिल्या सामन्यात बरोबरी नोंदविल्यानंतर ट्राऊ संघाने पाच सामने गमावले आहेत.

शिलाँग लाजाँग विजयी

स्पर्धेत बुधवारी मेघालयातील शिलाँग येथे झालेल्या सामन्यात शिलाँग लाजाँग एफसीने दिल्ली एफसीवर 2-1 फरकाने विजय नोंदविला. शिलाँगच्या संघासाठी करीम सांब व फ्रांग्की बुआम यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

दिल्ली एफसीसाठी गौरव रावत याने गोल केला. शिलाँग लाजाँगचे आता पाच लढतीतून नऊ गुण झाले असून स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे दिल्लीचे सात गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT