Professional League Football Dainik Gomantak
गोवा

Professional League Football: चर्चिल ब्रदर्सकडून हार पत्करलेल्या एफसी गोवाचा पहिलाच विजय; स्पोर्टिंगला नमविले

माल्सॉमत्लुआंगाचा भरपाई वेळेत निर्णायक गोल

किशोर पेटकर

Professional League Football माल्सॉमत्लुआंगा याने सामन्याच्या भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलमुळे प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाला स्पोर्टिंग क्लब द गोवास 1-0 असे निसटते नमविणे शक्य झाले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सोमवारी सामना झाला.

एफसी गोवाने सामन्यावर वर्चस्व राखताना गोल करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांना ऐनवेळी अपयश आले. त्यामुळे गोलसाठी भरपाई वेळेपर्यंत थांबावे लागले. योग्य नेमबाजी साधली असती, तर त्यांना मोठा विजय शक्य होता.

स्पर्धेतील पहिल्या लढतीत चर्चिल ब्रदर्सकडून एका गोलने हार पत्करलेल्या एफसी गोवाचा हा पहिलाच विजय ठरला. त्यांचे आता दोन लढतीतून तीन गुण झाले आहेत.

स्पोर्टिंगने अगोदरच्या लढतीत पॅक्स ऑफ नागोवाला दोन गोलने नमविले होते, मात्र सोमवारी पराभूत झाल्यामुळे दोन लढतीनंतर गतउपविजेत्या संघाचे तीन गुण कायम राहिले.

सुरवातीस काही संधी गमावल्यानंतर तिसाव्या मिनिटास एफसी गोवाच्या माल्सॉमत्लुआंगा याला गोलनेटसमोर कोणीच नसताना गोल करण्याची आयती संधी होती, परंतु त्याच्या फटक्याचा नेम साफ चुकला.

काही वेळानंतर फक्त गोलरक्षकाला चकवा देणे आवश्यक असताना एफसी गोवाच्या अमीन अत्तार याने अगदीच कमजोर फटका मारला.

सामना गोलशून्य बरोबरीत राहण्याची शक्यता असताना एफसी गोवाच्या माल्सॉमत्लुआंगा याने कोंडी फोडला.

बदली खेळाडू आकाश ओराव याने गोलक्षेत्रातून दिलेल्या क्रॉस पासवर सामनावीर ठरलेल्या माल्सॉमत्लुआंगा याने चेंडूला गोलनेटच्या डाव्या कोपऱ्यातील जागा मिळवून दिली, यावेळी स्पोर्टिंगचा गोलरक्षक मंजुनाथ पूर्ण अपयशी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT